एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil: वाल्मिक कराड यांच्यावर मोक्काचं 302 कलम लागलं नाहीतर मराठे रस्त्यावर उतरतील; मनोज जरांगेंचा इशारा

Beed Crime: संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाला वाल्मिक कराड यांच्या अटकेमुळे वेग आला आहे. मनोज जरांगे यांनी कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा सरकारला दिला आहे.

नांदेड: वाल्मिक कराडला आता अटक झाली , आता पुढचे सापडतील . संतोष देशमुख हत्याप्रकरणातील कोण कोण मोठे मासे आहेत ते आता सापडतील, असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे की नाही हे सिद्ध होईल . आता चौकशी सुरु होईल . काही आरोपी फरार आहेत . त्यांचे सीडीआर घेतले जातील . कॉल डिटेल्सवरुन सगळं समोर येईल. कोणी खंडणी मागितली आणि मागायला लावली, त्यासाठी कोणी फोन लावला? संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फरार होण्यासाठी कोणी मदत केली? त्यांना कोणी सांभाळले, हे चौकशीतून समोर येईल. याप्रकरणात मोक्काचे 302 कलम लागेल. सरकारने तसं केलं नाही तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ते बुधवारी नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मयत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय  माझ्याशी चर्चा करण्यासाठी आले होते. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अजून अटक का झाली नाही, याबाबत चर्चा झाली. आमच्या सर्वांची इच्छा आहे सगळे आरोपी अटक होऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे . त्यासाठी आता राज्यभर मोर्चे सुरु झाले आहेत. वाल्मिक कराडला आता अटक झाली , आता पुढचे सापडतील . कोण कोण मोठे मासे आहेत ते सापडतील, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.

संतोष देशमुख हत्याप्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत . पोलिसांनी शब्द दिलाय काही दिवसात अटक करु . नाही अटक झाली तर आम्ही आहोतच . सरकारने शब्द दिला , मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला , सगळ्यांना अटक करणार , शिक्षा करणार . या शब्दाला ते खरे नाही उतरले तर आम्ही रस्त्यावर येणार, असे मनोज जरांगे यांनी म्हटले. 

या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे, हे आत्ताच म्हणता येणार नाही. राहिलेले आरोपी किती दिवसात पकडतात हे बघू द्या. मग एकदा आम्ही सुसाट सुटलो तर सोडणार नाही. राजकारणात , समाजकारणात काम करतांना कोणी कोणाचं लाडक नसत, शत्रू नसतो , विरोधक नसतो . ज्या ज्या वेळेस चुकी होईल त्या त्या वेळेस बोलावं लागत , करावं लागत . ते दिलेला शब्द पाळत असतील तर आम्ही अपेक्षा ठेवून आहोत . शब्द नाही पाळला तर आम्ही रस्त्यावर उतरणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस म्हणत होते मी कोणाला अडसर नाही. , एकनाथ शिंदे साहेबांना विचारा मी अडसर आहे का मराठा आरक्षणाबाबत . आता लक्षात येईल तेच आहेत मुख्यमंत्री , 25 तारखेपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढतेत की नाही, ते स्पष्ट होईल. आमरण उपोषण 25 जानेवारीला फायनल आहे . सामूहिक सुध्दा होण्याची शक्यता आहे . कारण सगळेजण म्हणत आहेत आम्हाला पण उपोषणााला बसायचं आहे . ही शेवटची टक्कर द्यायची , अंतिम लढाई करुन आरक्षण मिळवायचे आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

राज्यात बहुमताच सरकार आहे  . तेव्हादेखील हेच होते ना . नुसते खांदे बदलले, नांगराचे बैल बदलल्यासारखे . पूर्वीही तेच होते आत्ता ही तेच आहेत . मराठ्यापुढे सरकार काही करत नाही. आमचं आंदोलन सरकार गांभीर्याने घेईल का नाही, हे आम्ही बघू आता . आतापर्यंत ढकलाढकली होती . आता मुख्यमंत्री फडणवीस आहेत . त्यांना 25 तारखेपर्यंत वेळ गेल्यावर तोपर्यंत काही बोलणार पण नाही, नंतर सोडणार नाही, असेही जरांगे यांनी सांगितले.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना मनोज जरांगेंचा इशारा

गृहमंत्रालयावर समाधानी असण्याचं  कारण नाही . मस्साजोग आणि परभणीत जीव गेला . मस्साजोग प्रकरणात आणखी आरोपी फरार आहेत . न्याय मिळाला तरी समाधान नाही कारण एका आईचा मुलगा गेला . वाल्मिक कराडबाबत पोलीस योग्य तपास करतील . पोलीस सोडणार नाही कोणालाच . मुख्यमंत्र्याचा तसा शब्द आहे .

धनंजय मुंडेनी राजीनामा द्यावा का त्याबद्दल मला माहीत नाही . मला एवढच माहिती आहे , या प्रकरणात जे जे येतील, मग मंत्री असो , आमदार असो की राष्ट्रपती असो, सुट्टी द्यायची नाही, अन्यथा आम्ही महाराष्ट्र बंद पाडणार . आरोपींनी कोणा कोणाला फोन केले, आरोपींना कोणी पळवून लावले, कोणी आसरा दिला . त्यावेळेस  कोणी कोणाला सरकारी पाठबळ दिले, यामध्ये कोण मंत्री आहे का , आमदार आहे का , सरकारमधील मंत्री आहे . सगळे कॉल डिटेल्स घेऊन तपासणी करण्याचा तपास करावी . 

एखाद्याला न्याय देण्यासाठी , विरोधी पक्षातला असो का सत्ताधारी पक्षातला असो जो आमदार बोलतो त्याच्या पाठीशी समाधान उभे राहिला पाहिजे . संदीप क्षीरसागर, खासदार, सुरेश धस, येण्यासाठी बोलत आहेत . यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे . हे प्रकरण आम्ही कसल्याच परिस्थितीत दबू देणार नाही . मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्द पाळला नाही राज्य आम्ही बंद पडणार . 100% मराठे रस्त्यावर उतरणार, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

आणखी वाचा

न्यायाधीशांच्या 'त्या' प्रश्नावर वाल्मिक कराड लगेच म्हणाला, 'मला पोलिसांकडून काही त्रास झाला नाही'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: वाल्मिक कराड यांच्यावर मोक्काचं 302 कलम लागलं नाहीतर मराठे रस्त्यावर उतरतील; मनोज जरांगेंचा इशारा
वाल्मिक कराड यांच्यावर मोक्काचं 302 कलम लागलं नाहीतर मराठे रस्त्यावर उतरतील; मनोज जरांगेंचा इशारा
Rajan Salvi: राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत; भाजपात जाणार की शिंदे गटात?
राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत; भाजपात जाणार की शिंदे गटात?
76 साल बाद! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली बस, गावकरी आनंदी; मुख्यमंत्र्यांचाही लाल परीतून प्रवास
76 साल बाद! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली बस, गावकरी आनंदी; मुख्यमंत्र्यांचाही लाल परीतून प्रवास
Accident : सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gadchiroli : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात धावली बस, गावकरी आनंदीABP Majha Headlines : 01 PM : 01 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRamdas Athawale Koregaon Bhima Shaurya Din : कोरेगाव-भीमा स्मारकासाठी 200 एकर जमीन मिळावीWalmik Karad CID Inquiry : बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडची सीआयडीकडून चौकशी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: वाल्मिक कराड यांच्यावर मोक्काचं 302 कलम लागलं नाहीतर मराठे रस्त्यावर उतरतील; मनोज जरांगेंचा इशारा
वाल्मिक कराड यांच्यावर मोक्काचं 302 कलम लागलं नाहीतर मराठे रस्त्यावर उतरतील; मनोज जरांगेंचा इशारा
Rajan Salvi: राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत; भाजपात जाणार की शिंदे गटात?
राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत; भाजपात जाणार की शिंदे गटात?
76 साल बाद! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली बस, गावकरी आनंदी; मुख्यमंत्र्यांचाही लाल परीतून प्रवास
76 साल बाद! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली बस, गावकरी आनंदी; मुख्यमंत्र्यांचाही लाल परीतून प्रवास
Accident : सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
अक्कलकोटजवळ भीषण अपघात, स्कॉर्पिओ कारचा चेंदामेंदा; भाविकांवर काळाचा घाला,  4 ठार, 7 जखमी
अक्कलकोटजवळ भीषण अपघात, स्कॉर्पिओ कारचा चेंदामेंदा; भाविकांवर काळाचा घाला, 4 ठार, 7 जखमी
वेस्टर्न रेल्वेमार्गावर मोठा अनर्थ टळला! रुळ वाकलेला दिसताच मोटरमनने विरार-चर्चगेट एसी ट्रेनला जागच्या जागी ब्रेक मारला
वेस्टर्न रेल्वेमार्गावर मोठा अनर्थ टळला! रुळ वाकलेला दिसताच मोटरमनने विरार-चर्चगेट एसी ट्रेनला जागच्या जागी ब्रेक मारला
Santosh Deshmukh Case : वाल्मीक कराड पोलिसांना का सापडला नाही, इतके दिवस फरार राहून तो शरण कसा आला? जलसमाधी आंदोलनात मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आक्रोश
वाल्मीक कराड पोलिसांना का सापडला नाही, इतके दिवस फरार राहून तो शरण कसा आला? जलसमाधी आंदोलनात मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आक्रोश
Ajit Pawar: वाल्मिक कराडांमुळे धनंजय मुंडे संकटात, पण अजित पवार कुठे? मौनामुळे चर्चांना उधाण
वाल्मिक कराडांमुळे धनंजय मुंडे संकटात, पण अजित पवार कुठे? मौनामुळे चर्चांना उधाण
Embed widget