ABP Majha Headlines : 11 AM : 30 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मान्सून भारतात दाखल, हवामान विभागाची घोषणा, केरळ आणि ईशान्य भारतात एकाच वेळी मान्सूनचं आगमन
महाडमधलं आंदोलन आव्हाडांच्या अंगलट, बाबासाहेबांचा अवमान केल्याप्रकरणी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, मुंबई, ठाणे आणि नागपुरसह राज्यभरात आव्हाडांविरोधात आंदोलन
ससून रूग्णालयाचे डीन डॉ. विनायक काळे सक्तीच्या रजेवर, पत्रकार परिषदेत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचं नाव घेणं भोवल्याची चर्चा
पुणे अपघातप्रकरणात खळबळजनक माहिती, अल्पवयीन मुलाऐवजी एका महिलेचं रक्त तपासणीला पाठवल्याचं अहवालात नमूद, रक्त मुलाच्या आईचं असल्याचा संशय
आमदार रवींद्र धंगेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, उत्पादन शुल्कमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून धंगेकरांविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार
विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत पेच.. मुंबई पदवीधर, शिक्षक, कोकण पदवीधरवर भाजपचा दावा, मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीनेही जाहीर केली उमेदवारी
मुंबई रस्ते सुशोभीकरण फर्निचर घोटाळ्यात व्हीजेटीआय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, सकारात्मक अहवाल देण्यासाठी ५० लाखांची लाच मागितल्याचा दावा
राज्यात मोठ्या प्रकल्पात केवळ १९ टक्के पाणीसाठा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक विभागात तीव्र टंचाई
येत्या ४८ तासांत आचारसंहिता शिथील होण्याची शक्यता, राज्यातल्या तीव्र दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णयाची शक्यता
लोकसभा निवडणुकांचा प्रचार आज संध्याकाळी थांबणार, १ जूनला अखेरच्या टप्प्यात ८ राज्यात ५७ जागांवर मतदान, ४ जूनला एबीपी माझावर महानिकाल
आरएसएस शाखांवर जाणाऱ्यांना गांधी समजणं अशक्य राहुल गांधींची टीका,शाखेत जाणारे गांधी नाही तर गोडसेच्या मार्गाने जातात राहुल गांधींचा घणाघात.
भुसावळमध्ये माजी नगरसेवक संतोष बारसेंवर अंदाधुंद गोळीबार, गोळीबारात बारसेंसह सहकाऱ्याचा मृत्यू, पूर्व वैमनस्यातून गोळीबार झाल्याची पोलिसांची माहिती