Mahabeej Soybean | महाबीज कर्मचारी संघटनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र, शेतकऱ्यांच्या तक्रारींवरच शंका
'महाबीज'च्या सोयाबीन बियाण्यांसंदर्भात राज्यभरात उद्भवलेल्या वादात आता 'महाबीज कर्मचारी संघटने'नं उडी घेतली आहे. यासंदर्भात संघटने'नं नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहिलं आहे. सोयाबीन बियाण्यांच्या तक्रारींसंदर्भात तांत्रिक बाबींकडे का लक्ष दिलं जात नाही? असा सवाल या पत्रात संघटनेनं केला आहे. तक्रार झालेल्या शेतात सर्वेक्षणाशिवाय नवीन बियाणे देण्यावरही संघटनेने आक्षेप घेतला आहे. तक्रारींच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित करत संघटनेनं तक्रारींच्या हेतुंवरच शंका उपस्थित केली आहे. या संपूर्ण प्रकरणात 'महाबीज'ला आरोपीच्या पिंजर्यात उभं केलं जात असल्यानं कर्मचाऱ्यांचं मनोबल खच्ची होत असल्याचं 'महाबीज कर्मचारी संघटने'नं मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या























