एक्स्प्लोर

Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे

Shiv Sena Symbol Verdict Updates : विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष या दोन वेगळ्या संस्था आहेत, त्यानुसार राहुल नार्वेकरांनी घेतलेले निर्णय हे अवैध ठरतात, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. 

नवी दिल्ली : दहावी अनुसूची म्हणजे पक्षांतर बंदी कायद्यानुसार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले सगळे आमदार आपोआप अपात्र ठरतात. तसे झाले नाही तर दहाव्या अनुसूचीचा उपयोग काय? असा जोरदार युक्तिवाद ठाकरेंच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला. निवडणूक आयोगानुसार शिवसेनेला मान्यता होती. त्यानुसारच उद्धव ठाकरे हे प्रमुखपदी होते. उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांना नेता आणि मंत्री म्हणून नियुक्त केलं होतं, असंही ते म्हणाले. 

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यामध्ये ठाकरेंच्या वतीने सडेतोड युक्तिवाद करण्यात आला. शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे आमदार अपात्र ठरतात. त्या आधारे निवडणूक आयोगाने आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी त्यावेळी घेतलेले निर्णय चुकीचे ठरतात, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.

शिवसेना पक्ष व चिन्ह प्रकरण : सुप्रीम कोर्टातील सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे 

1. कपिल सिब्बल यांनी 2013 ते 2022 या घटनाक्रमाची कालानुक्रमे माहिती न्यायालयासमोर मांडली.
2. शिवसेनेची 2013 व 2018 ची पक्षघटना वैध असून त्यानुसार उद्धव ठाकरे यांची नियुक्ती झाल्याचा दावा.
3. निवडणूक आयोगाला (ECI) पक्षघटनेची माहिती देण्यात आली होती; ती रेकॉर्डवर नसल्याचा आयोगाचा दावा चुकीचा असल्याचे सिब्बल यांचे म्हणणे.
4. 2013 किंवा 2018 च्या पक्षघटनेला शिंदे गटाने 2022 पर्यंत कधीही आक्षेप घेतला नव्हता.
5. उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांची गटनेते आणि सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केली होती.
6. 20 जून 2022 च्या विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस-व्होटिंगनंतर शिंदे गटाने बंड केल्याचा दावा.
7. 31 आमदार आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेल्याचा उल्लेख; हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप.
8. उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवून अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती.
9. उपसभापतींनी अजय चौधरी यांच्या नियुक्तीला मान्यता दिली होती.
10. गटनेते बदलण्यासाठी विधिमंडळ पक्षाच्या स्वाक्षऱ्यांची गरज नसून पक्षप्रमुखांना अधिकार असल्याचा युक्तिवाद.
11. 'विधिमंडळ पक्ष' आणि 'राजकीय पक्ष' या दोन वेगळ्या संस्था आहेत, असा सिब्बल यांचा मुद्दा.
12. 'सुभाष देसाई' निकालाचा दाखला देत, आमदारांना गटनेता किंवा व्हीप बदलण्याचा अधिकार नसल्याचा दावा.
13. 31 आमदारांनी शिंदे यांना गटनेता आणि नवीन व्हीप नेमल्याचा ठराव मंजूर केला होता.
14. सुनील प्रभू यांच्या अपात्रतेच्या नोटिसांकडे आमदारांनी दुर्लक्ष केल्याचा उल्लेख.
15. सरन्यायाधीशांनी निरीक्षण नोंदवले की, आमदार राजकीय पक्षाच्या नेत्यांना हटवू शकत नाहीत.
16. 31 आमदारांचे वर्तन हे पक्षाचे सदस्यत्व स्वेच्छेने सोडल्याचा पुरावा असल्याचा दावा.
17. अशा घटनांमुळे लोकशाही आणि मतदारांच्या कौलावर गंभीर परिणाम होत असल्याचा सिब्बल यांचा युक्तिवाद.
18. वेगळ्या चिन्हावर निवडून येऊन दुसऱ्या पक्षाशी जाणे म्हणजे निवडणूक प्रक्रियेची थट्टा असल्याचे मत.
19. न्यायमूर्ती बागची यांनी प्रश्न उपस्थित केला की, निवडणूक चिन्ह मूळ राजकीय पक्षाचे की विधिमंडळ पक्षाचे?
20. सिब्बल यांनी उत्तर दिले की, चिन्ह हे राजकीय पक्षाचे असते; विधिमंडळ पक्षाचे नाही.
21. न्यायालयाने विचारले की, राजकीय पक्षातील बहुमत ठरवण्याचे निकष ECI किंवा पक्षघटनेत स्पष्ट आहेत का?
22. गुवाहाटीत असतानाच शिंदे गटाने भाजपच्या पाठिंब्याने सरकार पाडण्याची तयारी केली होती, असा आरोप.
23. अपात्रतेच्या याचिकांवर विधानसभा अध्यक्षांनी विलंब केल्यामुळे दहाव्या अनुसूचीचा उद्देशच निष्फळ ठरल्याचा दावा.
24. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे यांना गटनेते आणि भरत गोगावले यांना व्हीप म्हणून मान्यता दिल्याचा उल्लेख.
25. सिब्बल यांचा दावा की, सरकारची स्थापना बेकायदेशीर प्रक्रियेतून झाली, तरी सरकारने पूर्ण कार्यकाळ पूर्ण केला.

ही बातमी वाचा:

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
माजलगाव नगरपालिकेच्या नगरसेविका रेखा अंबुरेंचं कुणबी प्रमाणपत्र रद्द, बनावट पुरावे सादर करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप
माजलगाव नगरपालिकेच्या नगरसेविका रेखा अंबुरेंचं कुणबी प्रमाणपत्र रद्द, बनावट पुरावे सादर करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Embed widget