Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
आज महाराष्ट्राच्या राजकारणात एका शब्दप्रयोगानं खळबळ उडवून दिली. हा शब्द म्हणजे गुंगी गुडिया. सोमवारी बीडमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेतील प्रसंगाचा दाखला देत काँग्रेसनं ही टीका केली आणि त्यानंतर राष्ट्रवादीतून संतापाची लाट उसळली. सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार करत इंदिरा गांधींचा इतिहास काँग्रेसलाच समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनीही एकाच दिवसात तीन पत्रकार परिषदा घेत आपली भूमिका लावून धरली. नेमकं काय घडलं, याचा आढावा घेऊया, या स्पेशल रिपोर्टमधून.
हा प्रसंग आहे बीडमध्ये सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेतला.
बीडमधील कायदा सुव्यवस्थेवरून पत्रकारानं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळण्यापूर्वीच धनंजय मुंडेंनी अशा प्रकारे पत्रकार परिषद गुंडाळली.
त्यानंतर याच प्रसंगाचा दाखला देत महाराष्ट्र काँग्रेसनं एक्स पोस्ट करत सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील, असा सवाल विचारला.
काँग्रेसच्या या टीकेनंतर राष्ट्रवादीं काँग्रेसचे कार्यकर्ते इतके संतप्त झाले की त्यांनी थेट काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयावर हल्लाबोल केला.
जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेसच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला.
ठाण्यातही हर्षवर्धन सपकाळांच्या प्रतिमेला काळं फासत काँग्रेस कार्यालयाच्या फलकावर काळी शाई फेकण्यात आली.
तर पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये चांगलीच झटापट झाली.
All Shows
































