एक्स्प्लोर
Kolhapur Clash | सिद्धार्थनगरमध्ये दोन गटात राडा, दगडफेक, गाड्यांची तोडफोड
कोल्हापुरातील सिद्धार्थनगर कमानीजवळ बॅनर लावण्याच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक करत गाड्यांचीही तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात शांतता असून, पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. 'सोशल मीडियावर येणाऱ्या मेसेज किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. दोन्ही समाज शांत आहेत. दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ नेत्यांनी आवाहन केले आहे की, जे काही घडले ते गैरसमजातून झाले आहे,' असे पोलिसांनी स्पष्ट केले. वर्धापन दिनानिमित्त लावलेल्या पोस्टर आणि साऊंड सिस्टिमला विरोध झाल्याने हा वाद उफाळला होता. दगडफेकीत सहभागी असलेल्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
कोल्हापूर
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Hasan Mushrif Kolhapur Speech : नेत्याने घेतलेला निर्णय पटो न पटो तो मान्य करायचा
Sanjay Mandalik Kagal : मुश्रीफ-घाटगेंची युती ED पासून वाचण्यासाठी, मंडलिकांचा हल्ला
Kolhapur Politics : कागलची कुस्ती, वस्ताद कोण? कागलच्या आखाड्यात दोन कट्टर शत्रू एकत्र Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























