Jalna Maratha Protestor : जालन्यात ठिणगी, राज्यात वणवा, विरोधकांच्या टीकेवर सत्ताधाऱ्यांचं उत्तर
तून... जालन्यात इंदेवाडी भागात पोलीस आणि आंदोलकांमध्ये आज पुन्हा वाद झाल्याची घटना समोर आली आहे. संध्याकाळी पाचच्या सुमारास जालना शहरातील अंबड चौफुली आणि इंदेवादीजवळ शेकडो आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले... यावेळी दगडफेकीचाही प्रकार घडला... जालना शहरातील इंदेवाडी भागामध्ये पोलीस आणि मराठा आरक्षणासाठी आग्रही असलेल्या आंदोलकांमध्ये तणाव निर्माण झाला होता...जालन्यातील अंतरवाली सराटी गावात काल मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. कालपासून या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. अनेक ठिकाणी लाठीमाराच्या निषेधार्थ आक्रमक होत मराठा समाजाने गाड्यांची जाळपोळ आणि तोडफोड केली.. तर दुसरीकडे या घटनेमध्ये पोलिसांवरदेखील दगडफेक करण्यात आली, यामध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे... सध्या अंबड चौफुली आणि इंडेवादीजवळ भागामध्ये तणावपूर्ण शांतता आहे