Devendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत
Devendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत
गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली, असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. ते पत्र माझ्याच कार्यालयात टाईप करण्यात आले होते. शरद पवार (Sharad Pawar)म्हणतात की, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्यात माझा कोणताही हात नव्हता. मात्र, प्रत्यक्षात त्यांनीच पाठवलेल्या पत्रामुळे राष्ट्रपती राजवट (presidential rule in Maharashtra) लागली, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. एका मराठी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी या संदर्भातील अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. 2019 च्या निवडणुकीनंतर राज्यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. यामुळे महाराष्ट्रात अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या होत्या. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेकी, “भाजपकडे सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा नव्हत्या, त्यामुळे आम्हाला सरकार स्थापन करता आलं नाही. त्यानंतर राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केलं, परंतु त्यांच्या महायुतीकडेही बहुमत नव्हतं. याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी माझी भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सरकार स्थापन करू इच्छित आहे. त्यानंतर एक बैठक झाली, ज्यामध्ये मी, अमित शहा, शरद पवार, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. त्या बैठकीत आम्ही सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.