एक्स्प्लोर
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेसह तुलसी विवाह समाप्ती; 'या' 5 जागी दिवे लावायला अजिबात विसरू नका, घरावर वर्षभर होईल धनवर्षाव
Kartik Purnima 2024 : दिवाळीअंति कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घरात आणि बाहेर विशिष्ट ठिकाणी दिवे लावल्याने विष्णू देव प्रसन्न होतात. अशा घरांत वर्षभर सुख-समृद्धी नांदते, आर्थिक संकटं नाहीशी होतात.
Kartik Purnima 2024 Vastu Tips Tulsi Vivah Samapti
1/10

कार्तिक पौर्णिमा, तुलसी विवाह समाप्तीचा दिवस म्हणजे दिवळाची शेवटचा दिवस असतो. या दिवशी जोरदार दिवाळी करावी, घरात आणि घराच्या परिसरात दिवे लावावे. असं केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि वर्षभर घरावर तिचा आशीर्वाद राहतो.
2/10

वास्तुशास्त्रानुसार, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घरातील या 5 ठिकाणी दिवे लावल्याने घरातील वास्तू सुधारते आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदते. पैशाची कधी कमी भासत नाही.
3/10

वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये तुळशीचं रोप असेल तर त्याजवळ तुपाचा दिवा लावावा. यामुळे तुळशीमातेचा आशीर्वाद मिळतो आणि घरात सुख-समृद्धी येते.
4/10

तुळशीच्या झाडाव्यतिरिक्त घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दिवे लावल्याने लक्ष्मीचा वास होतो आणि आर्थिक स्थिती सुधारते.
5/10

तुलसी विवाह समाप्तीच्या दिवशी घराच्या देव्हाऱ्यात दिवा लावणं देखील खूप शुभ मानलं जातं. यामुळे देवाचा आशीर्वाद मिळतो आणि घरात शांती नांदते, सकारात्मकता येते.
6/10

स्वयंपाकघराजवळ दिवा लावल्याने घरात अन्नधान्याचा साठा राहतो आणि घरात समृद्धी राहते.
7/10

तसेच या दिवशी अंगणात दिवा लावल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता निर्माण होते. घरावर वर्षभर धनवृष्टी होते.
8/10

तुलसी विवाह समाप्ती दिवशी संध्याकाळी 5:10 ते 7:47 पर्यंत शुभ काळ असतो. यावेळी दिवा लावणं खूप शुभ मानलं जातं. या काळात घरात दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा नांदते.
9/10

यंदा कार्तिक पौर्णिमा 15 नोव्हेंबर 2024 रोजी साजरी केली जात आहे. पंचांगानुसार, ही तिथी 15 नोव्हेंबरला सकाळी 6:19 वाजता सुरू होईल आणि 16 नोव्हेंबरला पहाटे 2:58 वाजता समाप्त होईल.
10/10

कार्तिक पौर्णिमेच्या, म्हणजेच तुलसी विवाह समाप्तीच्या दिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे.
Published at : 15 Nov 2024 11:45 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















