Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवड विधानसभेतील भाऊबंदकीत राहुल आहेरांनी मारली बाजी, केदा आहेर पराभूत
Chandwad Vidhan Sabha Constituency : 2019 मध्ये डॉ. आहेर राहुल यांनी शिरीष कोतवाल यांचा 26 हजार 537 मतांच्या फरकाने पराभव करून विजय मिळवला होता.
Chandwad Vidhan Sabha Constituency : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर चांदवड विधानसभा मतदारसंघाची (Chandwad Vidhan Sabha Constituency) राज्यात चर्चा झाली. या मतदारसंघात महायुतीत (Mahayuti) भाजपने विद्यमान आमदार राहुल आहेर (Rahul Aher) यांना पुन्हा एकदा संधी दिली. तर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काँग्रेसने शिरीष कोतवाल (Shirish Kotwal) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरहोतीवले. तर राहुल आहेर यांचे बंधू केदा आहेर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. या मतदारसंघातून राहुल आहेर, शिरीष कोतवाल की केदा आहेर? कोण उधळणार विजयाचा गुलाल? याकडे संपूर्ण राज्यभराचे लक्ष लागले होते. मात्र, चांदवड विधानसभा मतदारसंघातून राहुल आहेर यांनी बाजी मारली आहे.
- डॉ राहुल आहेर (भाजप)
- एकूण पडलेली मते : 104003
- गणेश निंबाळकर (प्रहार)
- केदा आहेर, अपक्ष - 48724
- एकूण पडलेली मते : 55460
- डॉ राहुल आहेर 48563 मतांनी विजयी
चांदवड मतदारसंघातील निवडणुकीच्या मुद्द्यांबाबत बोलायचे झाले तर हा परिसर शेतीप्रधान असल्याने सिंचन, पीक लागवडीच्या उपाययोजना आणि ग्रामविकास हे येथील लोकांचे महत्त्वाचे प्रश्न म्हणून पाहिले जातात. याशिवाय आरोग्य सुविधा आणि शिक्षणव्यवस्था देखील प्रमुख समस्या आहेत. चांदवड विधानसभा मतदारसंघावर 1999 पर्यंत भाजपचे वर्चस्व होते. 1999 मध्ये राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावून घेतली. या जागेवर भाजपला पुनरागमन करण्यासाठी 15 वर्षे लागली. 2014 मध्ये या जागेवरून राहुल आहेर यांना उमेदवारी देऊन भाजपने ही जागा काबीज केली होती. 2019 मध्ये डॉ. आहेर राहुल यांनी शिरीष कोतवाल यांचा 26 हजार 537 मतांच्या फरकाने पराभव करून विजय मिळवला होता.
चांदवडमधील तिरंगी लढतीत राहुल आहेर विजयी
यंदाच्या निवडणुकीत राहुल आहेर यांनी त्यांचे बंधू केदा आहेर यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह भाजपच्या वरिष्ठांकडे केला होता. मात्र, भाजपने उमेदवारांच्या पहिल्या यादीत राहुल आहेर यांच्या नावाची घोषणा केली. यामुळे केदा आहेर यांनी नाराजी व्यक्त केली होती. केदा आहेर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे एकीकडे राहुल आहेर आणि केदा आहेर या दोन लढत पाहायला मिळाली. तर या दोघांना काँग्रेसचे उमेदवार शिरीष कोतवाल यांचे आव्हान होते. मात्र राहुल आहेर यांनी बाजी मारली.
इतर महत्त्वाच्या बातम्या