Jalna It Raid : जालन्यात आयकरचं 'वऱ्हाड' 390 कोटींचं घबाड ABP Majha
आजची सर्वात मोठी बातमी आहे ती जालना, औरंगाबादमधील आयकर खात्याच्या कारवाईची. जालन्यातील स्टील कंपन्या, डिलर्स आणि अन्य व्यावसायिकांवर टाकलेल्या छाप्यात आयकर खात्याच्या हाती तब्बल ३९० कोटींचं घबाड लागलंय. या कारवाईतील नवनवी माहिती आता समोर येतेय. ५८ कोटींची रोकड, ३२ किलो सोनं असं सगळं सापडत असताना याची माहिती जालन्यातल्या लोकांना लागली नाही. तब्बल आठ दिवस ही कारवाई सुरु होती आणि आयकर विभागानं कारवाई गुप्त ठेवण्यासाठी लगीनघाईचं चित्रं उभं केलं होतं. त्यासाठी कारवर 'राहुल वेड्स अंजली'चे स्टिकर्स लावले होते. ही कारवाई इतकी मोठी होती की १० ते १२ मशिनच्या सहाय्यानं तब्बल १३ तास रोकड मोजण्यासाठी लागले. तर मालमत्तेची मोजदाद करताना आयकरचे काही अधिकारी आणि कर्मचारी आजारी पडले.....























