Smruddhi Highway Accident : समृद्धी वरील अपघात रोखण्यासाठी लवकरच होणार मोठी घोषणा...?
दिवसेंदिवस समृद्धी महामर्गाची ओळख हा " अपघातांचा महामार्ग " म्हणून निर्माण होत आहे .....कारणही तसच आहे.....समृद्धी महामार्ग सुरू होऊन दीडशे दिवस झालीत....आणि गेल्या १५० दिवसात या महामर्गावर जवळपास ९५० च्या वर अपघात झाले आहेत.....आणि जवळपास ४० जणांनी आपला जीव गमावला आहे.......आणि त्यामुळे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने याची गंभीरतेने दखल घेत MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी तत्काळ एक तज्ञांच पथक या महामार्गावर झालेल्या मोठ्या अपघात स्थळी निरीक्षण करण्यासाठी पाठविलं.... या पथकात तज्ञासह , वरिष्ठ परिवहन अधिकारी , वाहतूक पोलिस अधीक्षक सामील झाले होते. या पथकाने अलीकडेच समृद्धी महामर्गाच्या मोठे व जीवित हानी झालेल्या अपघात स्थळांच प्रत्यक्ष अपघातस्थळी जाऊन निरीक्षण केलं. निरीक्षण पथक आता लवकरच याचा अहवाल MSRDC ला सादर करून अपघात रोखण्यासाठी अजून नवीन काही उपाय योजना करणार आहे. या पथकात समृद्धी महामार्गाचे वरिष्ठ अभियंता एस.के. सुरवसे यांच्या नेतृत्वात या चमूने समृद्धी महामार्गाच्या अपघात प्रणव स्थळांच निरीक्षण केलंय .... सोबत ABP माझा ने प्रत्यक्ष निरीक्षण स्थळी सोबत जाऊन या तज्ञांच्या चमू सोबत बातचीत केली