(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajasthan CM : वसुंधरा राजे शर्यतीतून बाहेर; भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री
Rajasthan CM : वसुंधरा राजे शर्यतीतून बाहेर; भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवताना भाजपने मोठ्या धक्कातंत्राचा वापर केला. वसुंधराराजे या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे असल्याचं दिसत असतानाच भाजपने मात्र मुख्यमंत्रीपदाची माळ प्रथमच निवडून आलेल्या भजनलाल शर्मा यांच्या गळ्यात घातली. प्रथमच निवडून आलेल्या आमदाराला थेट मुख्यमंत्री करण्याचा गुजरात पॅटर्न राजस्थानातही भाजपने राबवला. भाजपने राजस्थानसाठी नियुक्त केलेले निरीक्षक राजनाथसिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे यांनी आज जयपूरला भेट दिली. पत्रकार परिषदेत भजनलाल शर्मांचं नाव वसुंधराराजेंच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आलं. याशिवाय राजस्थानात २ उपमुख्यमंत्रीही नियुक्त करण्यात आलेत. दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा हे उपमुख्यमंत्री असतील. राजस्थानात या तीन महत्त्वाच्या पदांची घोषणा करताना भाजपने जातीय समीकरणही सांभाळल्याचं दिसतंय. भजनलाल शर्मा हे ब्राह्मण समाजातले आहेत. तर दिया कुमारी या राजपूत समाजातून आहेेत, तर प्रेमचंद बैरवा हे दलित समाजातले आहेत.