एक्स्प्लोर

अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप

अजित पवार (Ajit Pawar) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

Anjali Damania on Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. राजकारण हे घाण आहे पण ते करावं लागणार असल्याचे दमानिया म्हणाल्या. लाडकी बहीण योजना बहिणींना सक्षम बनवण्यासाठी वापरली असती तर बरे झाले असते. ही लाच दिली गेली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला भिकारी बनवू नका. हे कराचे पैसे आहेत असे दमानिया म्हणाल्या. 

अंजली दमानिया काढणार नवीन राजकीय पक्ष 

दरम्यान, अंजली दमानिया यांनी आज मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात एक नवीन राजकीय पक्ष काढणार असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे. महाराष्ट्रच राजकारण एक गटार गंगा झाली आहे. निवडणुकीत मोठ्या पक्षाचा जनरल सेक्रटरी पैसे पाठताना पकडले गेल्याचे अंजली दमानिया म्हणाल्या. हे चौथी पास असणारे नेते देशाला कोणती दिशा देणार अशी टीका देखील अंजली दमानिया यांनी केली. ज्या लोकांना देशासाठी तळमळ आहे, त्यांना घेऊन सामान्य माणसासाठी हा पक्ष काढला जाईल. जनतेची क्रांती काय असते, आमचा पक्ष आल्यावर हे इतर पक्ष हादरतील असेही दमानिया म्हणाल्या. 

कोण आहेत अंजली दमानिया?

अंजली दमानिया या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी 2012 मध्ये आरटीआय कायद्याद्वारे (RTI Act) कोंढाणे धरण प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरण उघडकीस आणले होते. त्यावेळी त्या आम आदमी पक्षाच्या सदस्या आणि प्रवक्त्या होत्या. याच काळात त्यांनी भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) या दोन दिग्गज नेत्यांमध्ये व्यावसायिक संबंध असल्याचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी 2014 मध्ये भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरामधून लोकसभा निवडणूक लढवली होती. यात त्यांचा मोठा पराभव देखील झाला होता. 2015 मध्ये त्यांनी आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर देखील भष्ट्राचाराचे आरोप केले होते. यामुळे त्यांनी आप पक्ष सोडला. पुढे त्यांनी छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse )यांच्या विरोधात अनेक जनहित याचिका दाखल केल्या होत्या. 2016 मध्ये त्यांनी खडसेंच्या राजीनाम्याची मागणी करत अनिश्चित काळासाठी उपोषणही केले होते. या प्रकरणामुळे एकनाथ खडसेंना नाईलाजाने राजीनाामा द्यावा लागला होता.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! अंजली दमानिया यांची मोठी घोषणा, परिवर्तनासाठी महाराष्ट्रात काढणार नवीन राजकीय पक्ष

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट
ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट
New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या महत्त्वाचे बदल 
New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, जाणून घ्या महत्त्वाचे बदल 
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात;  तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On Kunal Kamra News : मग मलबारहिलवर बुलडोझर फिरवा, कुणाला कामराच्या ऑफिस तोडफोडीनंतर राऊतांचा संतापABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 5PM 25 March 2025Ajit Pawar vs Narayan Kuche :भाजप आमदाराचा प्रश्न,दादांचा पारा चढला;विधानसभेत नारायण कुचेंना भरला दमVinod Kamra New Song : हम होंगे कंगाल.., कुणाल कामराकडून नवा व्हिडीओ पोस्ट, शिवसेनेच्या नेत्यांची सडकून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट
ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट
New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या महत्त्वाचे बदल 
New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, जाणून घ्या महत्त्वाचे बदल 
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात;  तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं आणि रोख रक्कम घेऊन जाता येते? यासाठी नेमके नियम कोणते? 
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं घेऊन जाता येतं? यासाठी नेमके नियम कोणते? 
Embed widget