(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL Auction 2025 : युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
IPL Auction 2025 : युजवेंद्र चहलला लॉटरी लागली आहे. एकीकडे टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये त्याच्यावर पैशांचा वर्षाव झाला आहे.
जेहाद : आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाज युजवेंद्र चहलला मेगा लिलावापूर्वी राजस्थान रॉयल्स संघाने कायम ठेवले नव्हते. अशा परिस्थितीत तो मेगा लिलावात दिसला. या लिलावात त्याला विकत घेण्यासाठी अनेक संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहिला मिळाली. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवली होती, परंतु त्याला मोठी रक्कम मिळवण्यात यश आले. पंजाब किंग्जने त्याला 9 पट अधिक किमतीत खरेदी केले.
टीम इंडियातून बाहेर असलेल्या लेगस्पिनर चहलवर पैंशाचा पाऊस
भारतीय संघाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल पुन्हा लिलावात उतरला होता. ज्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. चहल हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. चेन्नईने चहलवर बोली लावायला सुरुवात केली, पण दुसऱ्या टोकाकडून गुजरातनेही चहलसाठी उत्सुकता दाखवली.
पंजाबनेही चहलला घेण्यासाठी बोली लावली आणि त्याची गुजरातशी टक्कर झाली. त्याचवेळी लखनऊनेही उडी घेतली. लखनऊ आणि पंजाब यांच्यात चहलसाठी सामना पाहिला मिळाला. पंजाबने चहलसाठी 14 कोटींची बोली लावली तेव्हा आरसीबी आणि हैदराबादनेही लिलावात उडी घेतली.
त्यानंतर चहलला घेण्यासाठी हैदराबाद आणि पंजाब यांच्यात चांगलीच चुरशीच लढत पाहिला मिळाला. पंजाबने चहलसाठी १८ कोटींची बोली लावली आणि हैदराबादने माघार घेतली. अशा प्रकारे चहल आयपीएल लिलावात विकला गेलेला भारताचा सर्वात महागडा फिरकी गोलंदाज ठरला.
पंजाबनं तीन खेळाडूंसाठी खर्च केले 62.75 कोटी
पंजाब किंग्जकडे आयपीएल ऑक्शनसाठी सर्वाधिक रक्कम शिल्लक होती. पंजाब किंग्जनं अर्शदीप सिंगला 18 कोटींना खरेदी केलं. यानंतर गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सला विजेतेपद मिळवून देणाऱ्या श्रेयस अय्यरला पंजाब किंग्जनं 26.75 कोटी रुपये खर्च करुन संघात घेतलं आहे. यानंतर, पंजाब किंग्जनं 18 कोटी रुपये खर्च करुन युजवेंद्र चहलला खरेदी केलं आहे.
लियाम लिव्हिंगस्टोन 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीसह मैदानात उतरला आणि हैदराबाद आणि आरसीबीने त्याच्यासाठी सुरुवातीची बोली लावली. मात्र, नंतर दिल्लीनेही लिव्हिंगस्टोनमध्ये रस दाखवला. मात्र, आरसीबीने लिव्हिंगस्टोनसाठी 8.75 कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली.
दक्षिण आफ्रिकेच्या हार्ड हिटर डेव्हिड मिलरला लखनऊ सुपर जायंट्स संघ आला आणि त्याला 7.50 कोटी रुपयांमध्ये सामील करून घेतले.
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती आणि त्याला घेण्यासाठी CSK आणि KKR यांच्यात शर्यत होती. केकेआरने शमीसाठी 8.25 कोटी रुपयांची बोली लावली, ज्यानंतर सीएसकेने माघार घेतली. मात्र, चेन्नईने माघार घेतल्यानंतर लखनऊने बोलीत उडी घेतली, पण केकेआरनेही हार मानली नाही. केकेआरने 9.75 कोटी रुपयांची बोली लावली आणि लखनऊने माघार घेतली. शमी यापूर्वी गुजरातकडून खेळला होता, पण टायटन्सने त्याच्यासाठी आरटीएमचा वापर केला नाही. पण केकेआरने 10 कोटींच्या किमतीत माघार घेतली, तर हैदराबादने शमीला याच किंमतीत विकत घेतले.
इतर बातम्या :