एक्स्प्लोर
Heat Wave in India : सहा राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट ABP Majha
मान्सून लांबणार आहे, एवढंच नाही तर बिहार आणि पश्चिम बंगालसह सहा राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेबाबत हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केलाय. त्यामुळे आणखी काही दिवस घामाच्या धारा सहन कराव्या लागतील. अरबी समुद्रात तयार होणाऱ्या चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम झालाय. मान्सून केरळच्या किनारपट्टीवर कधी दाखल होईल, याबाबत अनिश्चितता आहे. अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळामुळे केरळ किनारपट्टीवर मान्सून दाखल होण्यास थोडा विलंब होणार आहे. त्यातच अनेक राज्यांत पुन्हा उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. 7 ते 9 जूनदरम्यान विदर्भ आणि पूर्व उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















