Manoj Jarange : हिंगोलीत मनोज जरांगेंची जाहीर सभा, 16 एकरमध्ये सभेची जोरदार तयारी
मनोज जरांगे हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी यवतमाळसह नांदेड जिल्ह्यात मराठा समाजातील आंदोलकांच्या भेटी घेतल्या. आज मनोज जरांगे यांची हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा गावामध्ये सभा पार पडणार आहे. यासाठी 16 एकरवर तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जरांगे आज सकाळी आठच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव इथे सुरु असलेल्या साखळी उपोषणाला भेट देतील. त्यानंतर गिरगाव ते कुरुंदा अशी 300 मोटरसायकलची रॅली निघणार आहे. मग कुरुंदा इथे स्मशानभूमीमध्ये सुरु असलेल्या साखळी उपोषणाला जरांगे भेट देतील. त्यानंतर 16 एकरवर तयार करण्यात आलेल्या मैदानावर आयोजित एल्गार सभेला संबोधित करतील. या सभेला सुमारे 25 ते 30 हजार मराठा बांधव उपस्थित राहतील, असा आयोजकांचा अंदाज आहे. ही सभा झाल्यावर मनोज जरांगे वसमतहून परभणीकडे रवाना होतील.























