एक्स्प्लोर
Hingoli Banana : वाढत्या थंडीचा केळीच्या पिकाला फटका , बळीराजा चिंतेत : ABP Majha
राज्यात थंडीचा तडाखा वाढताना दिसतोय. काहीजण या गुलाबी थंडीचा आनंद लुटताना दिसतायत. मात्र तिकडे बळीराजाला मात्र या थंडीचा चांगलाच फटका बसतोय. हिंगोलीतील कुरुंदा भागात वाढत्या थंडीचा केळीच्या बागांना जबरदस्त फटका बसलाय. थंडी वाढल्यामुळे फळांची वाढ होत नाही. त्यामुळे केळ्यांना बाजारात भाव कमी मिळतो. थंडीमुळे केळीच्या सालींना धक्का बसतो... आणि पिकावर परिणाम होतो.. यामुळे केळीच्या उत्पादनात 30 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते अशी भीती व्यक्त होतेय.
आणखी पाहा























