एक्स्प्लोर
Fixed Mask Price | राज्य सरकारकडून नवे मास्क दर जाहीर, 3 रुपयापासून 127 रुपयांपर्यंत मास्कची किंमत!
कोरोना काळात हॅण्ड सॅनिटायझर आणि मास्क यांच्या किमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली होती. केंद्र शासनाच्या किमतीवरील नियंत्रणही 30 जून 2020 नंतर संपुष्टात आलं होतं. त्यामुळे मास्क, सॅनिटायझर यांच्या किमतीत पुन्हा वाढ झाल्याचं निदर्शनात आलं होतं. त्याचा भूर्दंड सामान्यांना सोसावा लागत होता. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याकरिता शासनाने एका समितीची स्थापना केली होती. आता राज्यात मास्कची किंमत 19 रुपये ते 127 रुपये असणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement














