Buldhana School Issue : शाळेत विद्यार्थी आहेत पण शिक्षक नाहीत, बुलढाण्यात शाळांचं विदारक वास्तव
...देशाच्या राष्ट्रपती पदावर आदिवासी समाजाच्या महिलेला विराजमान होण्याचा बहुमान मिळाला खरा...! मात्र बुलढाण्याच्या आदिवासी भागात मुलांना साधा शिक्षणाचा हक्क मिळत नाहीये. बुलढाण्यात शाळेवर शिक्षकांची नेमणूक असूनही शिक्षक येतच नसल्याने बुलढाण्याच्या आदिवासी भागातील शाळा गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत..याआधी प्रशासनाने कशीबशी एका शिक्षकाची तात्पुरती नियुक्ती या शाळेवर केली होती...पण हे शिक्षक देखील या शाळेवर गेल्या 14 दिवसांपासून फिरकलेच नाहीयेत.. शिक्षकच नाहीत म्हटल्यावर शाळा गेल्या 14 दिवसांपासून बंदच आहेत. त्यामुळे इथल्या 70 विद्यार्थ्याचं नुकसान झांलय.त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा कधी सुरु होणार याकडे लक्ष लागून आहे.























