Sangamner Leopard :कुरकुंडी शिवारात आढळला आजारी अवस्थेतील बिबट्या, वनविभागाने नेलं उपचारासाठी
काही दिवसांपूर्वी आजारी बिबट्या सोबत फोटोसेशनचे व्हिडिओ समोर आले होते मात्र संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कुरकुंडी शिवारात आजारी अवस्थेतील बिबट्या आढळून आल्यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाला तात्काळ माहिती देत वनविभागाच्या मदतीने बिबट्याला जेरबंद करून उपचारासाठी वनविभागाच्या ताब्यात दिलंय.. दोन ते सव्वा दोन वर्षे वयाची ही बिबट्या मादी असून झुडपांमध्ये निपचीत पडलेली होती. त्रिंबक सांगडे हे जनावरे चारत असताना त्यांना अचानक ही बाब लक्षात आल्याने त्यांनी तातडीने ही माहिती सरपंच शाहीन चौगुले यांना कळवली. त्यानंतर वनविभागाने घटनास्थळी धाव घेत जाळी टाकून या आजारी बिबट्याला जेरबंद केलंय. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. आजारी बिबट्यावर वन विभागाकडून उपचार सुरू आहेत.




















