ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 01 September 2024 Latest News
ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 01 September 2024
ही बातमी पण लावा
नांदेडमध्ये धो धो, नद्यांना पूर; 12 जनावरांचा मृत्यू , 25 घरांची पडझड, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
नांदेड : जिल्ह्यात गेल्या 36 तासांमध्ये पावसाचा जोर कायम असून अजूनही पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील 26 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. नदी नाले ओसंडून वाहत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमध्ये 12 जनावरे मृत्युमुखी पडली असून 21 घरांची अंशतः पडझड झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन ,कृषी,पाटबंधारे, महसूल व पोलीस विभाग स्थितीवर लक्ष ठेवून असून ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी आवश्यक साधनसामुग्रीसह तैणात राहण्याची सूचना बचाव पथकांना केली आहे. एनडीआरएफचे पथक तैणात असून कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, महसूल विभागाच्या सतर्कतेने मुदखेड तालुक्यात पुलाव अडकलेल्या नागरिकाची सुटका करण्यात आली आहे.
शनिवारी सकाळी दहा वाजतापासून रविवारी रात्री 7 वाजेपर्यंत पावसाची कुठे दमदार अतिवृष्टी तर कुठे रिपरिप सुरू आहे. सकाळी 10 पर्यंत आलेल्या आकडेवारी नुसार जिल्ह्यातील 63 मंडळांपैकी 26 मंडळांमध्ये 65 मिली लिटर पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. किनवट सारख्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला. रात्री उशिराही पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणीपात्रामध्ये वाढ झाली असून नागरिकांनी धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
![Sandeep Kshirsagar Massajog : 20 दिवसांनी माझ्या शहरात पाणी येतं, दादांचं काम माहिती आहे...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/0c0c8dd22c95904978ea6c531dd1db621739859726962976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Supriya Sule : Walmik Karad ची हिंमतच कशी होते, ही पैशाची मस्ती; सुप्रिया सुळे संतापल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/de3926297a81f86f9142fcde575f71851739859190312976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 11 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 18 Feb 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/cb71838009027ec28a3dd5c8da4ee4f71739858427130976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Supriya Sule Meet Deshmukh Family : 'वरुन फोन आला तक्रार घेऊ नका मग कितीही झालं तरी दखल घेत नव्हते'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/0d22c37f62020e6dbeeccf5569daddc11739857882117976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 10 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 18 Feb 2025 : ABP Majha : सकाळी 10 च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/11f2b9f450c0313743f0d3c99f483e0a1739856153351976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)