ABP Majha Headlines 10AM एबीपी माझा हेडलाईन्स 10 AM 15 July 2024
दरड कोसळल्यानं कोकण रेल्वेला फटका... मुंबईहून कोकणात जाणाऱ्या आणि येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या १५ तासांपासून
दरड कोसळल्याने दिवा-रत्नागिरी पॅसेंजर रद्द, तर मांडवी, जनशताब्दी, तुतारी आणि तेजस अजूनही ट्रॅकवरच, दक्षिणेत जाणाऱ्या गाड्या पुण्यामार्गे
रायगड आणि रत्नागिरीसाठी आज रेड अलर्ट, दोन्ही जिल्ह्यांमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, तर चिपळूण बाजारपेठेत शिरलेलं वाशिष्ठीचं पाणी ओसरलं
मुंबईतील पावसाने सरासरी हजार मिमीचा टप्पा ओलांडला, जुलै महिन्याची सरासरी अवघ्या १४ दिवसांत पूर्ण
मुंबईला पाणी देणाऱ्या ७ धरणांमध्ये आता ३५ टक्के पाणीसाठा, काल एका दिवसात ६ टक्क्यांची वाढ..
सांगलीतील वारणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, चार बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला तर कृष्णा नदीची पाणी पातळीत ८ फुटांची वाढ
पूजा खेडकर यांच्या कुटुंबाची पंकजा मुंडेंसोबत संबंधांची चर्चा, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला कुटुंबीयांची देणगी, तर पंकजांच्या उमेदवारीसाठी खेडकरांकडून मोहटा देवीला चांदीचा मुकुट