एक्स्प्लोर
Ranbir Alia Wedding : आरके हाऊसमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाची तयारी सुरु
बॉलिवूडची हॉट फेव्हरेट जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट येत्या १७ एप्रिलला लग्न करणार असल्याची बातमी आहे. हे लग्न पंजाबी पद्धतीनं चेंबूरमधल्या आरके हाऊसमध्ये होणार आहे. याच आरके हाऊसमध्ये रणबीरचे आई-वडिल ऋषी आणि नीतू यांचे १९८० मध्ये लग्न झालं होतं. रणबीरच्या लग्नासाठी आरके हाऊसमध्ये तयारी सुरु झालीय. लग्नाला करण जोहर, शाहरुख खान, आदित्य रॉय कपूर, विक्की कौशल-कॅटरीना कैफ, रणवीर सिंह-दीपिका पदुकोण यांच्यासह बॉलिवूडमधले बडे सेलिब्रेटी हजेरी लावणार आहेत.
आणखी पाहा























