SSC HSC Exam : दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार ABP Majha
दहावी, बारावीच्या ऑनलाईन परीक्षेसाठी आंदोलन, त्यानंतर रंगलेलं राजकारण गेल्या दोन दिवसांपासून रंगलंय. मात्र आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला लागावं लागणार आहे. कारण दहावी, बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार आणि ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाने याबाबत घोषणा केलीय. दहावीची लेखी ऑफलाइन परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होणार आहे. त्याची तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ दरम्यान होणार आहे. तर बारावीची लेखी परीक्षा ४ ते ३० मार्च दरम्यान होणार असून १४ ते ३ मार्च तोंडी परीक्षा होईल अशी माहिती शरद गोसावी यांनी दिलीय. ऑनलाईन शिक्षणामुळे लिहण्याचा सराव कमी झाल्याने परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वाढीव वेळ मिळणार आहे. तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था झिगझॅग पद्धतीने असेल.


















