Shailaja Darade Arrest : शिक्षक भरती घोटाळ्यात शैलजा दराडे यांना अटक : ABP Majha
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा शैलजा दराडेंना सोमवारी पुणे पोलिसांनी अटक केली. शिक्षक भरती घोटाळ्यात शैलजा दराडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्राथमिक चौकशीत त्या दोषी आढळल्यानंतर काही दिवसांपुर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं होत. त्यानंतर हडपसर पोलीसांनी त्यांना सोमवारी अटक केली. दराडेंच्या आधी शिक्षण परिषदेचे अध्यक्ष असलेले तुकाराम सुपे हे देखील टीईटी घोटाळ्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर शिक्षण परिषदेचा कारभार दराडेंकडे सोपवण्यात आला. मात्र शिक्षकांना नोकरी लावण्याच्या बहाण्याने दराडे यांनी लाखो रुपये प्रत्येकाकडून जमा केले होते, यामधून गोळा केलेली एकूण रक्कम पाच कोटींच्या घरात होती, असा आरोप आहेे












