एक्स्प्लोर
MPSC ची परीक्षा पुढे ढलकण्याचा निर्णय, मंत्री जितेंद्र आव्हाड, राज ठाकरेंसह अनेकांची मागणी मान्य
मुंबई : राज्यात 11 एप्रिल रोजी होणारी राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि अधिकारी यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत ही बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
आणखी पाहा


















