एक्स्प्लोर
Exam Issue : आरोग्य विभागाच्या परीक्षेतील घोळ संपेना, राज्यात अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रांवर गोंधळ
आरोग्य विभागाच्या परीक्षेतील घोळ संपत नसल्याचं समोर आलं आहे. मुंबई, पुणे, नाशिकमधील परीक्षा केंद्रांवर गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. पुण्यातील आबेदा इनामदार कॉलेज केंद्रावर परीक्षार्थींनी गोंधळ घातला. सकाळी १० वाजता पेपर सुरु होणं अपेक्षित असताना बराच वेळ पेपर मिळाला नसल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला आहे तर नाशिकमध्ये ही गिरणारे केबीएच महाविद्यालयातील परीक्षार्थींनी गोंधळ घातला आहे. विद्यार्थी जास्त आणि पेपर कमी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
आणखी पाहा


















