(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kabul Airport Blast : अफगाणिस्तानातील काबूल विमानतळाबाहेर स्फोटांची मालिका, मृतदेहांचा खच
काबूल विमानतळाबाहेर दोन ठिकाणी आत्मघातकी हल्ले झाले आहेत. विमानतळाच्या गेटवर एक स्फोट झाला तर दुसरा हल्ला बेरान हॉटेलजवळ झाला. या हल्ल्यांमध्ये मुलांसह 13 लोकांचा मृत्यू झाला आहे तर सुमारे 52 लोक जखमी झाले आहेत. आत्मघाती हल्ले झाले तेव्हा विमानतळावर आणि आसपास हजारो लोक उपस्थित होते.
वृत्तसंस्था रॉयटर्सनुसार, तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले की, काबूल विमानतळाबाहेर झालेल्या हल्ल्यात मुलांसह 13 जण मारले गेले.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले, आबे गेटवर स्फोट झाल्याची मिळाली आहे. यामुळे अमेरिकन आणि इतर नागरिकांना जीवितहानी झाली आहे. यानंतर काही वेळात बेरन हॉटेलजवळ आणखी एक स्फोट झाल्याची पुष्टी झाली आहे. आबे गेट आणि बेरन हॉटेलमधील अंतर कमी आहे. कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. अमेरिकेच्या अधिकाऱ्याने मात्र काबूल विमानतळाबाहेर स्फोट इस्लामिक गटाने घडवून आणला असल्याचे निश्चितपणे मानले आहे.