Rekha Jare Death Case | रेखा जरे हत्या प्रकरणात फरार आरोपी बाळ बोठे यांना तीन महिन्यांनंतर अटक
मुंबई : अहमदनगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्येप्रकरणी फरार असलेला आरोपी ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठे यांना तीन महिन्यांनंतर अटक करण्यात आली आहे. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बाळ बोठे यांना हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे.
रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी अहमदनगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाटा घाटात गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून आत्तापर्यंत 5 आरोपींना अटक केली होती. यातील आरोपी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठे हे फरार होते. त्यांचा तपास तब्बल तीन महिन्यांनी पोलिसांना लागला असून त्यांना हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे.






















