एक्स्प्लोर
भाऊ कदम बनला स्वच्छतादूत, रस्त्यावर उतरुन साफसफाई | मुंबई | एबीपी माझा
मराठी चित्रपट क्षेत्रातील विनोदवीर अभिनेता भाऊ कदम आज चक्क मुंबईतील रस्त्यांवर सफाई कामगारांच्या रूपात स्वच्छता करताना दिसून आला. यामुळे काही वेळ नागरिक चकित झाले, मात्र भाऊने ही स्वच्छता चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने केली आहे. दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. हा उत्सव फटाक्यांच्या आतषबाजींशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. ध्वनी आणि वायू प्रदूषणाला आमंत्रण देणाऱ्या या फटाक्यांचा कचरा दिवसागणिक वाढत चालला आहे. मात्र, या कचऱ्याकडे सहजपणे कानाडोळा केला जातो. परिसर अस्वच्छ करणारा हा कचरा त्वरित उचलणे गरजेचं आहे. बांद्रा येथील निवासी वसाहतीमध्ये 'नशिबवान' या आगामी चित्रपटाच्या टीमने स्वच्छता मोहिम राबवली.
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
जालना
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion
















