Majha Katta : ज्यांच्यामुळे फाळणी झाली आम्ही त्यांचं कसं समर्थन करू शकतो: तारेक फतेह
Majha Katta : मला याची खंत आहे की, ज्यांनी भारताला लुटलं, त्यात तैमूर असो, मुघल असो की, पोर्तुगीज आणि इंग्रज हे आमचे शत्रू आहेत. आपण त्यांचं कसं काय समर्थन करू शकतो ज्यांच्यामुळे फाळणी झाली, असं पाकिस्तानी लेखक आणि पत्रकार तारेक फतेह म्हणाले आहेत.
Majha Katta : मला याची खंत आहे की, ज्यांनी भारताला लुटलं, त्यात तैमूर असो, मुघल असो की, पोर्तुगीज आणि इंग्रज हे आमचे शत्रू आहेत. आपण त्यांचं कसं काय समर्थन करू शकतो ज्यांच्यामुळे फाळणी झाली, असं पाकिस्तानी लेखक आणि पत्रकार तारेक फतेह म्हणाले आहेत. एबीपी माझ्याच्या 'माझा कट्टा' या विशेष कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी अनेक प्रश्नाची उत्तरे दिली आहेत.
हिंदुस्थानात जन्माला आलेला माणूस हिंदूच: तारेक फतेह
तारेक फतेह म्हणाले आहेत की, भारतात ज्यांना शरिया कायदा आणायचा आहे, ज्यांना औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवायची आहे, अशा लोकांशी आमचा काही संबंध नाही. आम्ही मुस्लिम आहोत मात्र हिंदुस्थानात जन्माला आलेला माणूस हिंदूच असतो, असं ते म्हणाले आहेत. Chasing a mirage त्यांच्या या पुस्तकात फतेह यांनी इस्लाम आणि मुस्लिमांच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल भाष्य केलं आहे. याबद्दलच बोलताना ते म्हणाले की, या पुस्तकात सांगण्यात आलं आहे की इस्लामचा संबंध इस्लामिक स्टेटशी असू शकत नाही. इस्मालिक राष्ट्र बनवा असं कुराणमध्ये लिहिलेलं नाही. ते म्हणाले की, तैमूर, मुघल आणि इतर मुस्लिम राजे यांना पाहिलं तर त्यांचं असं होत की आम्ही जिथे जाणार तो इस्लामिक राष्ट्र होईल. हे असं कुठवर चालणार आहे.
पीएफआयशी संबंधित त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, या संघटनेचं लक्ष आहे की 2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवायचं आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, जगातील पहिले इस्लामिक देश हे भारताची फाळणी करून निर्माण झालं. याआधी कोणतेही इस्लामिक देश नव्हते का? इराण वेगळं, इंडोनेशिया, टर्की, सौदी अरेबिया आणि इजिप्त वेगळं, जर इस्लाममध्ये एकच राष्ट्राची संकल्पना आहे. तर मग हे देश वेगवेगळे का? पाकिस्तानने कोणावर अत्याचार केले तर ते बांगलादेशवर. तेही मुस्लिमच होते ना? ते म्हणाले की, ''माझ्याकडे इस्लामची 5 हजर पुस्तके आहेत. मी 13 वर्षांचा असल्यापासूनच हेच वाचलं आहे.''
इतर महत्वाच्या बातम्या:
नाफेडने खरेदी केलेला 50 टक्के कांदा खराब, वातावरणातील बदलामुळे कांदा खराब झाल्याची माहिती
Nanded News : मजुरांवर काळाचा घाला! नांदेडमध्ये आयशर आणि ट्रकच्या भीषण अपघातात पाच जण ठार