Nanded News : मजुरांवर काळाचा घाला! नांदेडमध्ये आयशर आणि ट्रकच्या भीषण अपघातात पाच जण ठार
Nanded News Update : बिहारमधून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या पाच कामगारांवर नांदेडमध्ये काळाने घाला घातला. अपघातात पाच कामगारांचा मृत्यू झालाय.
![Nanded News : मजुरांवर काळाचा घाला! नांदेडमध्ये आयशर आणि ट्रकच्या भीषण अपघातात पाच जण ठार Nanded News Update Five killed in accident between Eicher and a truck in Nanded Nanded News : मजुरांवर काळाचा घाला! नांदेडमध्ये आयशर आणि ट्रकच्या भीषण अपघातात पाच जण ठार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/24/0bd21ad22469025dba86b2131b6cf9351664035996184328_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nanded News Update : नांदेड-किनवट राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सोनारीफाटा करंजी जवळ ट्रक आणि आयशरची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले आहेत. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना हिमायतनगर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्री साडे आठच्या सुमारास हा अपघात झालाय. ठार झालेले मजूर हे बिहारचे आहेत.
बिहारमधून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या पाच कामगारांवर नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात करंजी फाट्याजवळ काळाने घाला घातला. मयत व जखमी सर्व रेल्वेच्या कामासाठी हिमायतनगर परिसरात वास्तव्यास होते. रात्री आठच्या सुमारास ते आपल्या निवासस्थानाकडे परतत असताना त्यांच्या आयशर टेम्पोला सिमेंट नेणाऱ्या ट्रकने धडक दिली. या धडकेत आयशरमधील पाच कामगार जागीच ठार झाले, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनुर, सहायक पोलीस निरीक्षक महाजन, यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गंभीर असलेल्या कामगारांना उपचारासाठी रूग्णात पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नांदेड किनवट राज्य महामार्गावर हिमायतनगर जवळ असलेल्या करंजी गावाजवळ भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक आणि आयशरची समोरासमोर धडक झाली. यात बिहारमधून रेल्वे कामासाठी आलेल्या चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर समोरून येणाऱ्या आयशरच्या चालकाचा देखील मृत्यू झाला आहे. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारांसाठी नांदेड रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
हे रेल्वे कामगार हिमायतनगर तालुक्यात रेल्वेचे काम करत होते. त्यांचा मुक्कामही हिमायतनगर येथे असल्याची माहिती आहे. तर आयशरचा चालक हा भोकर येथील रहिवासी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)