एक्स्प्लोर

Zero Hour : Solapur Corporation : महापालिकेचे महामुद्दे : सोलापुरचा पाणीप्रश्न कधी सुटणार?

तुम्ही पाहाताय एबीपी माझा... आणि ब्रेकनंतर झीरो अवरमध्ये आपलं पुन्हा स्वागत...
झीरो अवरच्या दुसऱ्या सत्रात आपण पाहणार आहोत महापालिकेचे महामुद्दे. आणि या विशेष सत्रात आज आपण पहिल्यांदा जाणार आहोत सोेलापूर शहरात. सोलापुरात पाण्याची समस्या आहे, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. पण त्यासाठी धरणात पाणी कमी असणं हे कारण नाहीय. प्रशासकीय अनास्था हे त्यामागचं सर्वात मोठं कारण आहे. पण उजनी धरणाचं पाणी नेमकं मुरतंय कुठे? प्रशासन नेमकं कुठे कमी पडतंय यावरचा सविस्तर स्पेशल रिपोर्ट आपण पाहूयात. 

हा नळ पाहा. कोरडा ठाक. आठवड्यातील सहा दिवस या नळाला सुट्टी असते. कारण सोलापुरात पाच ते सहा दिवसांत एकदा पाणी येतं. हद्दवाढ भागात तर परिस्थिती आणखीनच बिकट आहे. 

पाच ते सहा दिवसांनी जेव्हा पाणी येतं, तेव्हा देखील ते कधी कमी दाबानं येतं, तर कधी दूषित पाणी येतं. त्रासात भर म्हणजे पाणी येण्याची कुठली ठरलेली वेळही नाही. यामुळे खासकरून महिला वर्गाचे प्रचंड हाल होतात. 

पाण्याची इतकी भीषण समस्या असली तरी गेल्या अनेक वर्षांपासून सोलापुरातील सर्व निवडणुका या पाण्याच्या मुद्द्यावरच लढल्या जातात. मात्र तरीही नळाला पाणी येत नाही ते नाहीच. 

उजनी धरण ते सोलापूर शहर अशी ११० किलोमीटरची पाईपलाईन २०१७मध्ये मंजूर करण्यात आली. 

सुरुवातीला याची क्षमता प्रतिदिन ११ कोटी लीटर इतकी होती. 

मात्र भूसंपादन वेळेत न झाल्यानं प्रकल्प रखडू लागला 

प्रकल्प लांबल्यामुळे कंत्राटदार कंपनी देखील अधिक पैसे मागू लागली 

त्यामुळे प्रकरण लवादात गेलं 

२०२३ मध्ये लवादाचा निर्णय आला, त्यानंतर
कंपनीला फेरनिविदा देण्यात आली 

नंतर प्रकल्पाची क्षमता देखील वाढवल्यामुळे
सध्या प्रति दिन १७ कोटी लीटर क्षमतेच्या पाईपलाईनचं काम सुरू आहे 

या पाईपलाईनचं काम जवळपास पूर्ण होत आलं असलं तरी दुसरी एक समस्या आहेच. ती म्हणजे जलशुद्धीकरण प्रकल्पाचं काम पूर्ण होण्यासाठी आणखी एक ते दीड वर्ष लागणार आहे. आणि म्हणूनच २०२५ सालातही सोलापूरकरांना आठवड्यातून किमान दोनदा पाणी मिळणं अशक्य दिसतंय. 

सोलापुरात अनेक समल्या असल्या तरी पाण्याची समस्या सर्वात भीषण आणि प्रत्येकाला भेडसावणारी आहे. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत देखील हा मुद्दा गाजणार हे नक्की. आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर.

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड

Embed widget