Zero Hour Mahapalikache Mahamudde Solapur | सोलापूरचा विकास आराखडा का ठरतोय वादग्रस्त?
Zero Hour Mahapalikache Mahamudde Solapur | सोलापूरचा विकास आराखडा का ठरतोय वादग्रस्त?
हे देखील वाचा
पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला राज्यात 42 केंद्रावर कॉपी; 12 वी परीक्षेत मराठवाड्यातच सर्वाधिक कॉपीची नोंद
मुंबई : राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेच्या (Exam) पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला राज्यात 42 केंद्रांवर कॉपीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. याप्रकरणी, भरारी पथकाने नोंद घेत संबंधितांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारकडून यंदा 12 वी बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा राबवण्यासाठीचे अभियान जोमाने चालवले जात आहे. त्यासाठी, विशेष प्रयत्न केले जात असून स्वत: शिक्षण राज्यमंत्र्यांनी देखील आज बुलढाण्यातली एका परीक्षा केंद्रावर धाड टाकून पाहणी केली. यावेळी, कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी सरकार गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र, 12 वीच्या (HSC) पहिल्याच पेपर दिवशी 42 ठिकाणी कॉपी (Copy) केल्याचा गैरप्रकार समोर आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक कॉपीचे प्रकार हे छत्रपती संभाजी नगरमध्ये उघडकीस आले असून 26 केंद्रांवर याठिकाणी कॉपी प्रकरणाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, मुंबई, कोल्हापूर आणि कोकण विभागातून एकही गैरप्रकार समोर आलेला नाही. या विभागात कॉपीमुक्त अभियान पहिल्याच दिवशी 100 टक्के यशस्वी ठरल्याचे दिसून आले.
राज्यात 12 वी परीक्षेसाठी 15 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 9 विभागात असलेल्या विविध केंद्रांवर उपस्थित राहून परीक्षा दिली. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना कॉपी न करण्याचे आवाहन करत परीक्षा केंद्रावरील प्रमुखांकडून सक्त ताकीद देण्यात आली होती. त्यामुळे, कुठे दडपणात तर कुठे उत्साहात 12 वी परीक्षेचा पहिला इंग्रजी विषयाचा पेपर संपन्न झाला. मात्र, काही ठिकाणी कॉपीचा गैरप्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. राज्यात 42 ठिकाणी कॉपीचा गैरप्रकार घडला असून सर्वाधिक 26 ही संख्या छत्रपती संभाजीनगर विभागातील आहेत. त्यामध्ये, जालन्यातली काही केंद्रावर सर्रासपणे कॉपीचा प्रकार घडत असल्याचे व्हिडिओ व फोटोही समोर आले आहेत.
All Shows

































