एक्स्प्लोर

OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश

या नवीन निर्णयामुळे राज्यातील 15 जिल्ह्यांत ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार असून, ही पदे आता खुल्या प्रवर्गात वर्ग करण्यात आली आहेत.

OBC Reservation Sarpanch: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण आरक्षण 50 टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने 15 जिल्ह्यांतील इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) सरपंचपदांच्या आरक्षणाबाबत सुधारित आदेश जारी केले आहेत. या नवीन निर्णयामुळे राज्यातील 15 जिल्ह्यांत ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार असून, ही पदे आता खुल्या प्रवर्गात वर्ग करण्यात आली आहेत.

आरक्षणाची पार्श्वभूमी आणि बदल

राज्य निवडणूक आयोगाने 13 जून 2025 रोजी आरक्षण निश्चितीची अधिसूचना प्रसिद्ध केली होती. या अधिसूचनेनुसार 15 जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी एकूण 6 हजार 719 सरपंचपदे आरक्षित ठेवण्यात आली होती. मात्र, 50 टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेचे पालन करण्याच्या आयोगाच्या निर्देशानंतर ग्रामविकास विभागाने 30 एप्रिल रोजी नवीन सुधारित आदेश जारी केले. या आदेशानुसार, ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित पदांची संख्या आता 6 हजार 207 इतकी निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच पूर्वी जाहीर केलेल्या पदांमधून ५१२ पदे कमी करण्यात आली आहेत. ओबीसी आरक्षणातील ही 512 पदे कमी झाल्याने त्याचा थेट लाभ खुल्या प्रवर्गाला मिळाला आहे. खुल्या प्रवर्गासाठी पूर्वी 13 हजार 77 पदे निश्चित करण्यात आली होती, ती संख्या आता 512 ने वाढून 13 हजार 589 इतकी झाली आहे. 50 टक्क्यांच्या मर्यादेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी 15 जिल्ह्यांत हे सुधारित समीकरण लागू करण्यात आले आहे.

प्रवर्ग पूर्वी निश्चित केलेली पदे 30 एप्रिलच्या आदेशानुसार पदे बदल
ओबीसी (इतर मागास प्रवर्ग) 6,719 6,207 512 पदे कमी
खुला प्रवर्ग 13,077 13,589 512 पदे वाढ

अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा

दुसरीकडे, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा अशा राज्यातील सर्व भागांमध्ये मराठ्यांवर आणि कुणबींवर अन्याय होत असल्यास एकजुटीने आणि आक्रमकपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या आंदोलनाची तयारी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, खानदेश, विदर्भ, मराठवाडा जिथे जिथे मराठ्यांवर, कुणबीवर अन्याय होईल, त्यांनी एक जीवाने आणि आक्रमकपणे उठायचे आणि 29 ऑगस्टच्या अंतरवालीच्या आंदोलनाची तयारी करायची, ही विनंती आहे. कुणाच्या दबावाला बळी पडू नका. घाबरू नका. शांत बसू नका, आक्रमक व्हा," असे त्यांनी म्हटले.

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav on Uday Samant: ‘ठाकरेंवर टीका करून तुमची पापं झाकली जाणार नाहीत’; उदय सामंतांवर भास्कर जाधव संतापले, म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार का?’
‘ठाकरेंवर टीका करून तुमची पापं झाकली जाणार नाहीत’; उदय सामंतांवर भास्कर जाधव संतापले, म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार का?’
India Alliance on SIR Meeting: इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
Manoj Jarange: गुलाम व्हायचं नाही, प्रसंगी मरु पण सोडणार नाही, 15 दिवसात मी सगळ्याचा खुलासा करणार; मनोज जरांगेंनी ठणकावून सांगितलं
गुलाम व्हायचं नाही, प्रसंगी मरु पण सोडणार नाही, 15 दिवसात मी सगळ्याचा खुलासा करणार; मनोज जरांगेंनी ठणकावून सांगितलं
Advertisement

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Alliance on SIR Meeting: इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
Ketan Agrawal Case : साक्षीदारांना गडावरून फेकण्याची धमकी; एका महिलेलाही धमकावलं; चार्जशीटमधून कोणत्या गोष्टी समोर आल्या, केतनच्या वडिलांनी दिली माहिती
साक्षीदारांना गडावरून फेकण्याची धमकी; एका महिलेलाही धमकावलं; चार्जशीटमधून कोणत्या गोष्टी समोर आल्या, केतनच्या वडिलांनी दिली माहिती
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे 5 वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे 5 वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच
'लिव्ह इन'मधून जन्मलेल्या बाळाची तीनवेळा विक्री, 500 किमीच्या प्रवासात किंमत वाढत केली; चिमुकल्या जीवापुढे माणुसकी मेली
'लिव्ह इन'मधून जन्मलेल्या बाळाची तीनवेळा विक्री, 500 किमीच्या प्रवासात किंमत वाढत केली; चिमुकल्या जीवापुढे माणुसकी मेली
Nilesh Ghaywal: मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
Supreme Court on Challan: चालान दंड होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून थकवला आहे का? सुप्रीम कोर्टाने वसुलीचा मार्ग सांगितला!
चालान दंड होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून थकवला आहे का? सुप्रीम कोर्टाने वसुलीचा मार्ग सांगितला!
Embed widget