Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार..? तुम्ही म्हणाल की अरे, आता तर फुटली होती! (बरोबर तीन वर्षांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २ जुलै २०२३ रोजी दोन शकलं झाली. पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह अजित पवारांच्या नेतृत्वातील गटाला मिळालं. तर नवं नाव आणि नवं निवडणूक चिन्ह शरद पवारांच्या नेतृत्वातील गटाला मिळालं.म्हणजेच काय तर एका राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पक्ष झाले आणि पक्ष फुटला!) (त्यातला एक सत्तेत तर दुसरा विरोधात बसला. दोन्हींच्या नावात राष्ट्रवादी काँग्रेस होतंच. या पक्ष फुटीनंतर अगदी अजितदादांच्या निधनापर्यंत तरी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर उघड उघड चर्चा कधीच झाली नाही.)
(पण २०२५ च्या शेवटाला राज्यात महापालिका निवडणुकामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काही ठिकाणी एकत्र लढल्या. आणि विलिनीकऱणाच्या चर्चांना जोर आला. कोणत्याही क्षणी विलिनीकरण होईल असं वाटतं असतानाच २८ जानेवारीला अजित पवारांचं विमान दुर्घटनेत निधन झालं. आणि त्यानंतर विलिनीकरणाच्या बातम्यांनी आणखीच वेग धरला.) (मात्र, शरद पवारांच्या नेत्यांनी जितक्या उत्साहानं विलिनीकरणावर भाष्य केलं. त्यातुलनेत दादांच्या राष्ट्रवादीनं रिस्पॉन्स दाखवला नाही आणि पुढे महिन्याभरात विलिनीकरणाचा विषय संपला.)
मग, आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीच्या चर्चा का सुरु झाल्यात? त्याला कारण आहे... एक नोटीस.. आणि कायदेशीर नोटिस!)
(त्याचं झालं असं की दादांच्या निधनानंतर २६ फेब्रुवारीला सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली पण त्या निवडीवरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह आक्षेप घेतलाय. इतकंच नाही तर त्यांनी थेट कायदेशीर नोटीसही पाठवलीय. शिवाय सुनेत्रा पवारांची निवड रद्द करण्याची आणि अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केलीय!)
राष्ट्रवादी
मग हा वाद फक्त पक्षघटनेच्या नियमांचा आहे का? कारण तुम्हा आठवत असेल तर, राष्ट्रावदीच्या नेतृत्त्वातच अंतर्गत कलह आहेत का अशी शंका काही महिन्यांपूर्वी जाणकारांना पडली होती. प्रफुल्ल पटेल विरुद्ध सुनेत्रा आणि पार्थ पवार असा संघर्ष पक्षात पाहायला मिळाला होता.) (सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला मार्च महिन्यात पत्र पाठवत रद्द केला होता फेब्रुवारी महिन्यातला पत्रव्यवहार रद्द केला होता. सुनेत्रा पवारांच्या या पत्रात, प्रफुल्ल पटेलांचा उल्लेख केवळ राज्यसभेचे गटनेते तर सुनील तटकरेंचा उल्लेख लोकसभेचे गटनेते असा करण्यात आला होता. आणि पक्षाच्या कार्यकारिणीतल्या त्यांच्या पदांचा उल्लेख नव्हता.) (पुढे या चुका सुधारल्या जातील, असं सुनेत्रा पवारांनी सांगितलं होतं. पण त्यावेळच्या या वादग्रस्त एपिसोड चा धागा पकडून राष्ट्रवादीत नेतृत्वाच्या सत्तासंघर्षाची नवी ठिणगी पडली आहे? हा प्रश्न आज अनेकांना पडलाय. यासह अनेक गोष्टींवर आपण आज चर्चा कऱणार आहोत.. मात्र, त्याआधी पाहुयात आजचा पहिला प्रश्न.. तोच पाहण्यासाठी जावूयात पोल सेंटरला..
All Shows
































