Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला

Palghar Blast Tarapur: पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील तारापूर एमआयडीसी परिसरात असलेल्या विराज प्रोफाइल कंपनीत सोमवारी सकाळी भीषण स्फोट झाला. सकाळी काम सुरु असताना कंपनीत एकापाठोपाठ तीन भीषण स्फोट झाले. हे स्फोट इतके शक्तिशाली होते की, या स्फोटांच्या धक्क्यांनी आजुबाजूचा परिसर हादरला आहे. याशिवाय स्फोटाची (Blast) तीव्रता इतकी होती की, कारखान्याच्या बांधणीसाठी वापरलेले लोखंडी पत्रे उडून पडले आहेत. एवढेच नव्हे तर सुरक्षारक्षकांची केबिन असलेल्या भागातही काचा फुटल्या आहेत. यावरुन या स्फोटाच्या तीव्रतेची कल्पना येऊ शकते. (Palghar Blast news)
विराज प्रोफाईल ही कंपनी तारापूर एमआयडीसीच्या एसएमएस वन या प्लांटमध्ये आहे. ही कंपनी भंगार वितळवून त्यापासून स्टील तयार करते. आज सकाळी पहिल्या शिफ्टचे कामगार कंपनीत आले होते. त्यांनी काम सुरु केल्यानंतर काहीवेळातच कंपनीतली फॅर्नेस टँकमध्ये स्फोट झाला. हा स्फोट झाला तेव्हा कंपनीत 100 ते 150 कामगार हजर होते. स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. आतापर्यंत तीन कामगार जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, या स्फोटाची तीव्रता पाहता आणखी काही कामगार जखमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आज सकाळी नेहमीप्रमाणए उत्पादन सुरू असताना अचानक झालेल्या या जोरदार आवाजाने कारखान्यातील कामगारांसह लगतच्या स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली. स्फोटाची माहिती मिळताच मदतकार्य सुरू करण्यात आले असून जखमी कामगारांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तारापूर एमआयडीसीमध्ये वारंवार होणाऱ्या अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने, येथे रोज काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या जीवाचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत ऐरणीवर आला आहे.
Before You Go
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी























