Zero Hour : Kolhapur Corporation : महापालिकेचे महामुद्दे :फेरीवाल्यांनी अडवले रस्ते, नागरिकांचं काय?
मंडळी मोठी शहरं म्हटली की महानगरपालिका आलीच. मात्र आपल्याकडच्या महापालिका अनेकदा अधिकार नसलेले कागदी वाघ वाटतात. याचं कारण जे लोक नियम तोडून नागरिकांची प्रचंड गैरसोय करतात, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. विषय आहे फेरीवाल्यांचा. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक या शहरांना अनेक वर्षांपासून फेरीवाल्यांचा विळखा पडलाय. आता या यादीत कोल्हापूर देखील येऊन बसलंय. महापालिका मात्र हतबल आहे.. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट.
कोल्हापूर. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं सुंदर शहर. या शहराला मात्र घरघर लागलीये.. याचं कारण फेरीवाले.
खरंतर काही वर्षांपूर्वी कोल्हापूरमधील सर्व प्रमुख रस्त्यांचं रुंदीकरण करण्यात आलं. यासाठी तब्बल ४०० कोटींचा खर्च करण्यात आला. मात्र कोल्हापूरकरांना या रुंद रस्त्यांचा लाभ घेताच आला नाही.
कारण पाहावं तिथं फेरीवाल्यांनी रस्ते आणि फुुटपाथ आडवलेत. त्यामुळे रस्ता जरी तीन किंवा चार लेनचा असला तरी नागरिकांना मात्र एक किंवा फार फार तर दीडच लेन वापरता येते.
फेरीवाल्यांचा प्रश्न इतका गंभीर असूनही महापालिकेनं चक्क हतबलता व्यक्त केलीये
फेरीवाल्यांचा त्रास कमी म्हणून की काय तर पार्किंगची समस्या देखील हाताबाहेर चालली आहे. पूर्वी बांधलेल्या घरांमध्ये पार्किंगची सोय नसल्यानं रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गाड्या पार्क केलेल्या असतात. त्यामुळे केवळ चारचाकी चालकांनाच नाही तर दुचाकीस्वारांना देखील गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागते.
एकूणच काय, नागरिकांनी मालमत्ता कर भरायचा, गाडी घेताना देखील विविध कर भरायचे, इंधन भरताना १०० टक्क्यांहून अधिक कर भरायचा आणि आयुष्यभर गैरसोयीत जगायचं... बहुधा हीच आता शहरी जीवनाची व्याख्या बनलीये.. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर.
All Shows





महत्त्वाच्या बातम्या





























