(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Zero Hour Full : विधानपरिषदेत प्रसाद लाड- अंबादास दानवे यांच्यात हमरीतुमरी, दानवेंकडून शिवीगाळ
नमस्कार मी विशाल पाटील... झीरो अवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे...
पावसाळा सुरू झाला.. जून संपून जुलै लागला.. पण म्हणावा तसा पावसाचा जोर काही पाहायला मिळालेला नाही.. पण राज्यात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात मात्र, आरोप-प्रत्यारोपांचा महापूर पाहायला मिळतोय..
आज अधिवेशनाचा चौथा दिवस.. आणि आज कामकाजाला सुरूवात होताच, पेपरफुटी प्रकरणावरून विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलं..
नोकरभरतीच्या परीक्षांचे आयोजन, परीक्षा फीसह, विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं... हातात बॅनर घेऊन आणि घोषणाबाजी करत, पेपरफूटी रोखण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली.. त्यांनी ठिय्या देखील दिला.. दरम्यान विरोधकांच्या या आंदोलनापाठोपाठ सत्ताधाऱ्यांकडूनही, जोरदार घोषणाबाजीला सुरूवात झाली.. मंत्री दादा भूसे, भरत गोगावले, संतोष बांगर, आशिष शेलार, राम कदम यांनी अर्थ संकल्पातल्या संकल्पावरून घोषणा दिल्या.. तसंच व्यंगचित्रातून विरोधकांवर टीकाही केली...
विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू असताना.. विधानसभेत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांंनी पेपरफुटीच्या मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर आगपाखड केली.. पाहूयात..
बाळासाहेब थोरातांच्या या टीकेवर, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही तितक्याच जोरदारपणे प्रत्युत्तर दिलं... पेपरफुटीबाबत घडलं काय आणि काय नरेटिव्ह पसरवले जातंय, अशी टीकाही फडणवीसांनी केली.. पेपरफुटीनंतर तीन मोठ्या निर्णयांची घोषणा करताना, सरकारच्या काळात राज्यात विक्रमी नोकरभरती झाल्याचा दावाही फडणवीसांनी केला... पाहूयात..
नीट परीक्षेवरून गदारोळ सुरू असतानाच, आता सीईटीच्या निकालातही घोळ होत असल्याचं समोर आलंय.. सीईटीच्या परीक्षेत गडहिंग्लज येथील एका विद्यार्थ्याला १३० गुण मिळाले, पण त्याला ४३ पर्सेंटाईल होते.. तर ११२ गुण असणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्याला ९८ पर्सेंटाईल दिलेत.. या निकालामुळे विद्यार्थी आणि पालक आक्रमक झाले आहेत.. त्यांनी सीईटी निकालात घोळ झाल्याचा आरोप केलाय.. तसंच न्यायालयात दाद मागणार असल्याचंही त्या पालकांनी म्हंटलंय..
दरम्यान या सर्व पेपरफुटीच्या घोळाबाबतच आम्ही आजच्या भागात प्रश्न विचारला होता.. तो प्रश्न पाहण्यासाठी जावूया आपल्या पोल सेंटरवर..