Zero Hour : Mahayuti तून मंत्रिपदावरची खदखद उघड, Ajit Pawarयांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली?
नमस्कार मी सरिता कौशिक.. झीरो अवरच्या विशेष भागात आपलं स्वागत.. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला सुरुवात झाली.. आणि नरेंद्र मोदींनी काल पंतप्रधान शपथ घेत, माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरुनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याचा त्यांनी विक्रम केलाय.. इतकंच नाही तर सलग तिसऱ्यांदा बिगर काँग्रेसी पंतप्रधान होण्याचाही विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदीेंनी केलाय.. खरंतर, यावेळी एकट्य़ा भाजपकडे संपूर्ण बहुमत नसलं तरी एनडीएच्या जोरावर नरेंद्र मोदींनी तिसऱ्या टर्मला सुरुवात केली.. आणि मोदींनी याच ऐतिहासिक टर्मची सुरुवात केली ती शेतकऱ्यांसाठीच्या अत्यंत महत्वाच्या निर्णयानं.. जो आपण पाहणार आहोतच ... पण त्या आधी कालच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीकडे वळूया ... शपथविधी झाला जरी असला दिल्लीत, तरी त्याचे पडसाद उमटलेयेत महाराष्ट्रात ... ते नक्की काय आहेत हे पण आजच्या भागात बघायचंय. तर सुरुवात करूयात राष्ट्रवादीच्या मंत्रिपदानं.. तुम्ही म्हणाल की, दादांच्या पक्षानं तर केंद्रातलं मंत्रिपद नाकारलंय.. तर हो.. तुम्ही एकदम बरोबर समजलात.. अजित पवारांना राज्यमंत्रीपद स्वतंत्र प्रभार.. अशी ऑफर होती... जी त्यांनी नाकारलीय.. आज सकाळपासून सोशल मीडियावर त्यामुळे एक प्रश्न फिरतोय .. जर बिहारमधील जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चाला अजित पवारांप्रमाणेच लोकसभेची एक जागा जिंकून थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळालंय, तर तोच न्याय अजितदादांना का नाही? यावरच आहे आपला आजचा पहिला प्रश्न.. तोच पाहण्यासाठी जावूयात.. पोल सेंटरला..