Zero Hour Full EP : युतीसंदर्भात वेळ आल्यावर सांगेन, राज ठाकरेंच्या वक्तव्याचा अर्थ काय? सखोल चर्चा
नमस्कार, मी अमोल जोशी, झिरो आवरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या दीड दशकापासूनच सर्वाधिक वेळा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? आजवर अनेकदा हा प्रश्न विचारला गेला. त्यावर उलटसुलट चर्चा झाली आणि तो प्रश्न पुन्हा थंड सुद्धा झाला. आता गेल्या साडेतीन महिन्यांपासून पुन्हा या प्रश्नाची नव्यानं चर्चा सुरू झाली आहे. १९ एप्रिल या दिवशी राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना एक मुलाखत दिली आणि त्यामध्ये एक विधान केलं आणि त्याला काही तासातच उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर गेले साडेतीन महिने ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं दिसतंय. अगोदर मराठी विजय मेळाव्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी मातोश्रीला सरप्राईज भेट दिली आणि त्यानंतर घरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे आता राज ठाकरेंच्या घरी जाणार हेसुद्धा ठरलंय. या सगळ्या काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या बोलण्यातली खुली सकारात्मकता आणि राज ठाकरेंच्या भाषेतली सावध सकारात्मकता यामध्ये किती फरक आहेत, याची चर्चा सुद्धा रंगली. त्यानंतर आज मुंबईत झालेल्या मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संदेश देताना एक महत्वाचं विधान केलं. ते असं म्हणाले की "वीस वर्षांनंतर, वीस वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का म्हणता?" असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना विचारला. हा प्रश्न विचारताना राज ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत दिलेला संकेत हा चर्चेचा विषय ठरला. मराठीच्या मुद्द्यावरची सकारात्मकता आणि नात्यातली सकारात्मकता सध्या स्पष्टपणे दिसत असली तरीसुद्धा राजकीय युतीबाबत मात्र स्पष्टभाष्य अजूनही राज ठाकरेंनी केलेलं नाहीये. योग्य वेळी निर्णय घेऊ असा संदेश त्यांनी दिलाय. दिशा युतीची असली तरी अजूनही एक साशंकतेची किनार या सगळ्याला आहे का? युतीची घोषणा होण्यापूर्वी अजून कुठले महत्त्वाचे टप्पे दोन्ही पक्षांना आणि दोन्ही नेत्यांना पार करावे लागणार आहेत? या आणि अशाच काही प्रश्नांचा वेध आज आपण घेणार आहोत.
All Shows





महत्त्वाच्या बातम्या





























