एक्स्प्लोर
Zero Hour Lt Col Satish Dhage : देशात 6 महिन्यांत 2 हल्ले,नेमकं कारण काय?
फरीदाबादमध्ये सुमारे ३००० किलो स्फोटके जप्त केल्याच्या पार्श्वभूमीवर, संरक्षण विश्लेषक लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) सतीश ढगे यांनी दहशतवाद्यांच्या बदललेल्या रणनीतीवर प्रकाश टाकला. 'एका बाजूला पारंपारिक पद्धतीने स्फोटकांचा वापर करून हल्ला करायचा आणि दुसऱ्या बाजूला बायो-केमिकलचा वापर करून...अशा प्रकारचे दुहेरी संकट आपल्यासमोर येत आहे,' असे ढगे म्हणाले. या चर्चेत त्यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीर व्यतिरिक्त उत्तर प्रदेश, हरियाणा, हैदराबाद आणि गुजरातमध्येही दहशतवाद्यांचे जाळे पसरले आहे. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा यांसारख्या संघटना आता केवळ पारंपरिक स्फोटकांवर अवलंबून नसून, रायसिन (Ricin) सारख्या बायो-केमिकल शस्त्रांचा आणि ड्रोन व एनक्रिप्टेड कम्युनिकेशन ॲप्ससारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. या स्फोटकांचा वापर करून देशभरात एकाच वेळी किमान २० ठिकाणी हल्ले करण्याची योजना होती, असेही ढगे यांनी स्पष्ट केले.
All Shows
झीरो अवर

Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा

Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?



























