Uddhav Thackeray on BMC Election :बीएमसीला ठाकरेंचा पक्ष स्वबळाच्या वाटेनं जाणार का? Special Report
इंडिया आघाडीतल्या ठिणगीनंतर आता आघाडीतल्या पक्षांमध्ये स्वबळाचे वारं वाहू लागलय...दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसची आघाडी होईल अशी चर्चा असताना अरविंद केजरीवाल यांनी स्वबळाचा नारा दिलाय...आता महाराष्ट्रातसुद्धा तोच पाढा गिरवला जाण्याची शक्यता आहे. येत्या महापालिका निवडणुकांमध्ये मविआत असणाऱ्या ठाकरेंचा पक्ष स्वबळाच्या वाटेनं जाणार का, असा प्रश्न उपस्थित झालाय...पाहूयात राजकीय शोलेमधला ह स्पेशल रिपोर्ट....
देशपातळीवर इंडिया आघाडीत बिघाडीचे पडघम वाजू लागलेत...
आणि त्यानंतरही महाराष्ट्रातही महाविकास आघाडीत
कुरबुरी सुरू झाल्यात...
येत्या फेब्रुवारीत होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत
आम आदमी पक्षानं एकला चलो रेचा नारा दिलाय...
इंडिया आघाीडीतच असणाऱ्या काँग्रेससोबत दिल्लीत आघाडी
करणार नसल्याचं केजरीवाल यांनी स्पष्ट केलंय..
दिल्लीत काँग्रेसला विरोध करुनच आप सत्तेत आला होता.
या आधीच्या निवडणुकांमध्ये २०१५ साली दिल्लीत आम आदमी पक्षाने ७० पैकी ६७ आणि २०२० साली ७० पैकी ६२ जिंकत सत्ता स्थापन केली होती.
मात्र लोकसभेला पंजाबमध्ये आप आणि काँग्रेसचं सूत जुळलं नाही.
तीच स्थिती बंगालमध्ये ममतांच्या तृणमूल आणि काँग्रेसची झाली होती.
आता तर ममता बॅनर्जींनी उघडउघड इंडिया आघाडीच्या नेतेपदावरच दावा केल्यानं काँग्रेससोबतचा त्यांचा वाद
ताणला गेलाय...