Special Report | कोरोनाला हरवलं, नियतीसमोर हरले; पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या कुटुंबावर काळाचा घाला
नवी मुंबई : कोरोना काळात चोवीस तास ॲानड्यूटी असल्याने आपला परिवाराला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून नवी मुंबई मनपातील डॉ. वैभव झुंजारे यांनी परिवाराला गावाकडे ठेवले होते. पण काल परत घेऊन येताना मुंबई-पुणे एक्सप्रेसवर झालेल्या अपघातात त्यांच्या कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. कोरोनातून वाचलेलं कुटुंब अपघातात मात्र दगावलं.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर खंडाळा घाटातील फुडमॉलजवळ भरधाव कंटेनरची चार वाहनांना जोरदार धडक दिली. हा अपघात काल (मंगळवारी) मध्यरात्री एकच्या सुमारास झाला. या अपघातात नवी मुंबई महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ वैभव झुंझारे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला.
All Shows

































