Mumbai Rani Baug | मुंबईकरांची प्रतिक्षा संपली, लॉकडाऊननंतर उद्या राणीबाग पुन्हा खुली होणार
बई : मुंबईकरांची प्रतिक्षा संपली असून लॉकडाऊननंतर उद्या राणीबाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय पुन्हा खुलं होणार आहे. यावेळी शक्ती आणि करिश्मा वाघ राणीबागेतलं खास आकर्षण असणार आहेत. अस्वल, तरस, कोल्हे, बिबट्या यांचंही उद्यापासून राणीबागेत दर्शन मिळणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पण, यासाठी पर्यटकांना नियमावली पाळावी लागणार आहे.
औरंगाबाद येथील सिद्धार्थ गार्डन व प्राणिसंग्रहालयातून पट्टेरी वाघांच्या एका जोडीचे 12 फेब्रुवारी, 2020 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात आगमन झाले आहे. दाखल झालेल्या या वाघांच्या जोडीमध्ये 6 वर्षे वय असलेल्या एका वाघिणीचा (मादी) समावेश असून तिचे नाव ‘करिश्मा’ असे आहे. तसेच या जोडीमध्ये असणाऱ्या वाघाचे (नर) नाव ‘शक्ती’ असे असून त्याचे वय 4 वर्षे आहे. या जोडीच्या बदल्यात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातून दोन जोडी ‘चितळ’ आणि दोन जोड्या ‘चित्रबलाक’ (रंगीत करकोचा) सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाला देण्यात आले आहेत.