Mahapalika Election Special Report : प्रलंबित निवडणुका, रखडलेले प्रश्न; सामान्यांच्या मागण्या काय?
Mahapalika Election Special Report : प्रलंबित निवडणुका, रखडलेले प्रश्न; सामान्यांच्या मागण्या काय?
गेल्या ५ वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेसाठीची समीकरणं सतत बदलत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी कसं सामोरं जाणार, एकत्र लढणार की स्वबळाचा नारा देणार याची उत्सुकता होती, या कामात महायुतीने काहीशी आघाडी घेतल्याचं चित्र आहे. मुंबईसारख्या ठिकाणी एकत्र तर इतर ठिकाणी ज्याचं जास्त बळ तो स्वबळ आजमावण्याच्या विचारात दिसत आहे. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट
महायुतीचं ठरलंय...असं म्हणायला आता जागा आहे. कारण तसे सगळे संकेत महायुतीतील नेते देत आहेत.
मुंबईत महानगरपालिकेत काय करायचं.. राज्यात कुठे एकत्र लढायचं..
कुठे स्वबळावर लढायचं याची चाचपणी पूर्ण झाली आहे.
मुंबई महापालिका निवडणुका महायुतीत तर इतर ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता वाढली आहे. मुंबई मध्ये मराठी मते फुटू नयेत तसेच उत्तर भारतीय मतांचा फायदा देखील महायुतीलाच व्हावा यासाठी सेना भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याची जास्त शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
All Shows

































