Aurangabad Fake Bill Scam : बनावट बिलांचा महाघोटाळा, 2 जणं ताब्यात Special Report
जीएसटी विभागाने केलेल्या एका कारवाईत बनावट बिलांचा महाघोटाळा समोर आलाय.. राज्य कर जीएसटीच्या औरंगाबाद कार्यालयाने केलेल्या तपासणीत 35 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 500 कोटींची बनावट बिलं समोर आली आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्याची व्याप्ती तब्बल एक हजार कोटींच्या घरात असल्याचा अंदाज जीएसटी कार्यालयातर्फे व्यक्त केला जातोय. त्याच दृष्टीने राज्यकर जीएसटी विभाग तपास करीत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच जीएसटी विभागाने घोटाळा बाहेर काढल्याने खळबळ उडालीये.. बनावट बिले लावून जीएसटीला चुना लावणाऱ्या दोघांना जीएसटी विभागाने ताब्यात घेतलं होतं त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आलाय.. फैजल अब्दुल गफ्फार आणि मोहम्मद अजीज मोहम्मद फकीर असे या दोन्ही आरोपींचे नावं आहेत....
सगळे कार्यक्रम





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
