Special Report Dr. Babasaheb Ambedkar Statue : इंदू मिलमधील बाबासाहेबांचं स्मारक कुणामुळे रखडलंय?
भूमिपूजनाची तारीख- ११ ऑक्टोबर २०१५,
संपूर्ण काम पूर्ण होण्याचं अपेक्षित वर्ष होतं- २०२१,
आणि आता सुरू असलेलं वर्ष आहे- २०२४...
हा लेखाजोखा आहे... महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाच्या कामाचा... आणि तब्बल तीन वर्ष झालेल्या विलंबाचाही... या तारखा आणि वर्ष पाहून आता सर्वांना एकच प्रश्न पडलाय... फक्त जयंती आणि पुण्यतिथीलाच, चौका चौकात बॅनरवर स्वत:चा फोटो लावण्यासाठी नेतेमंडळींना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते का? पाहूयात याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट...
हे देखील वाचा
ह्रदयद्रावक... पहिल्याच दिवशीची शाळा सुटल्यानंतर फिरायला गेलेल्या 3 मुलींचा बुडून मृत्यू; गावावर शोककळा
अहमदनगर : पावसाळा सुरू झाल्यामुळे पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याची किंवा वीज पडून दुर्घटना झाल्याच्या घटना घडत आहेत. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावातील तीन मुलींचा पाण्यात बुडून (Drowned) मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. गावातील सोमनाथ बढे यांच्या शेतातील अर्धवट काम झालेल्या शेततळ्यात पडून तीन मुलींचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी व गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मुलींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आजपासून राज्यभरातील शाळा सुरू झाल्या असून शाळेच्या पहिल्याच दिवशी अशी दुर्घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मेंढवण गावातील सोमनाथ बढे यांच्या खासगी शेततळ्याचं काम सुरू होतं. मात्र, काही कारणास्तव हे काम सध्या बंद असल्याने शेततळं अर्धवटच बांधण्यात आलं होतं. आज शाळेचा पहिलाच दिवस असल्याने शाळा सुटल्यानंतर फिरत फिरत तीन मुली शेततळ्याकडे गेल्या. या शेततळ्यात पावसाचं पाणी साचलं होतं. दुर्दैवाने खेळत असताना पाण्यात बुडून तिन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.