Rohit Shetty Majha Maha Katta : मुंबईची लोकल ते रेड कार्पेट,रोहित शेट्टीची थ्रिलर सक्सेस स्टोरी
Rohit Shetty Majha Maha Katta : मुंबईची लोकल ते रेड कार्पेट,रोहित शेट्टीची थ्रिलर सक्सेस स्टोरी
Rohit Shetty Majha Katta : दिग्दर्शक रोहित शेट्टीनं (Rohit Shetty) एबीपी माझाच्या महाकट्टा या कार्यक्रमामध्ये त्याच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'ला (majha katta) अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाकट्ट्याचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात रोहित शेट्टीनं हजेरी लावली. यावेळी रोहित शेट्टीनं चित्रपटांबद्दल तसेच त्याच्या बालपणीच्या आठवणींबद्दल सांगितलं.
रोहित शेट्टीनं त्याच्या बालपणाबद्दल सांगितलं, 'मी डायरेक्टर व्हायचं कधी ठरलं. हे मला आठवतं नाही. माझे वडील चित्रपटसृष्टीत काम करत होते. ते अॅक्शन डिरेक्टर होते, त्यामुळे असं वाटतं होतं की, हेच आपलं काम आहे. लहानपणापासूनच विचार केला होता की, अॅक्शन डिरेक्टर व्हायचंय. '
पुढे रोहितनं सांगितलं, 'माझ्या कुटुंबात आई होती, वडील होते. मी तिसरीत असताना माझ्या वडिलांचे निधन झाले. जे वडिलांनी काम केलं तेच काम मला करायचं होतं. तेव्हा आम्ही सांताक्रुझमधून दहिसरला शिफ्ट झालो. माझी शाळा सांताक्रुझमध्ये होती. मी लोकलमधून आणि बसमधून प्रवास करुन शाळेत जात होतो. वडिलांचे निधन झाल्यानंतर आई काम करत होती. माझी आई स्टंट आर्टिस्ट होती. तिनं काही दिवस ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केलं. मी वयाच्या 18 व्या वर्षापासून काम करत आहे. मी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं. कॉलेजमध्ये कधी गेलो नाही. मला माहित होतं मला काय काम करायचंय. आपण नेहमीच स्टुडंट असतो. प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी शिकायला मिळतं.'